10 वीच्या मुलीची मैत्रिणींकडून फसवणूक, भावाकडून बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल...
दोन तरुणींनी मिळून एका मैत्रिणीची फसवणूक केल्याची संताजनक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणींनी त्यांच्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन घरी बोलवलं आणि आपल्या भावाकडून तिच्यावर बलात्कार घडवून आणला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10 वीच्या मुलीची मैत्रिणींकडून फसवणूक
भावाकडून बलात्कार घडवून आणला अन्...
अश्लील व्हिडीओ शूट करून ब्लॅकमेल
Rape Case: दोन तरुणींनी मिळून एका मैत्रिणीची फसवणूक केल्याची संताजनक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणींनी त्यांच्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन घरी बोलवलं आणि आपल्या भावाकडून तिच्यावर बलात्कार घडवून आणला. इतकेच नव्हे तर, त्याचा व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
मैत्रिणीच्या भावाकडून पीडितेवर बलात्कार...
संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशातील बरेली येथील असल्याची माहिती आहे. प्रकरणातील पीडिता 10 वीची विद्यार्थीनी असून तिच्या दोन्ही मैत्रिणींनी तिला फूस लावून घरी बोलवलं. त्यानंतर, अल्पवयीन पीडित तरुणीला जेवणातून नशेचे पदार्थ देऊन तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर, आरोपीच्या सख्ख्या भावाने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा: भिगवण : लग्न चार दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं
व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सुद्धा बनवण्यात आला. पीडितेला गप्प ठेवण्यासाठी आणि तिला ब्लॅकमेल करण्यासाठी तिच्यावरील लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ काढण्यात आला. संबंधित तरुणीच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, या घृणास्पद कृत्यात आरोपी अनसचे आई-वडील आणि त्याच्या दोन्ही बहिणींचा समावेश होता. पीडितेचे वडील कामानिमित्त उत्तराखंडला होते आणि तिथून ते परत आल्यानंतर, त्यांनी मुलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची तक्रार नोंदवली. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा: फेब्रुवारी महिन्यात ज्योतिषीय उलथापालथ; प्रलंबित कामे पूर्ण होणार, पण काही राशींच्या लोकांसमोर आव्हाने...
आरोपीला पोलिसांकडून अटक
प्रकरणातील मुख्य आरोपी अनसला सध्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या अटकनेनंतर, आरोपीने कॅमेऱ्यासमोर आपला गुन्हा कबूल केला आणि माफी मागण्याचं नाटक केलं. आता पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग अशा संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याच्याविरुद्ध कारवाई केली जात असल्याची माहिती आहे.










