पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी माझी व माझ्या समाजाची बदनामी-संजय राठोड
पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीचा पुण्यात मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. मी आणि संपूर्ण बंजारा समाज हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. विरोधकांनी, भाजपने या प्रकरणाचं घाणेरडं राजकारण केलं. जाणीवपूर्वक या प्रकरणी माझी आणि माझ्या समाजाची प्रतिमा मलीन करण्यात आला. मी गायब झालो नव्हतो, कुठेही कामं थांबवलं नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून माझी सगळी कामं […]
ADVERTISEMENT

पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीचा पुण्यात मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. मी आणि संपूर्ण बंजारा समाज हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. विरोधकांनी, भाजपने या प्रकरणाचं घाणेरडं राजकारण केलं. जाणीवपूर्वक या प्रकरणी माझी आणि माझ्या समाजाची प्रतिमा मलीन करण्यात आला. मी गायब झालो नव्हतो, कुठेही कामं थांबवलं नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून माझी सगळी कामं सुरू होतील. पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस तपास करत आहेत त्यामधलं सत्य बाहेर येईल. माझा पोलिसांवर विश्वास आहे असंही संजय राठोड यांनी सांगितलं. पोहरादेवी या ठिकाणी संजय राठोड दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसांनी हे स्पष्टीकरण दिलं. अकारण माझी, माझ्या समाजाची बदनामी करू नका ती थांबवा असंही आवाहन मी करतो आहे असंही संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
पाहा पूजा चव्हाण प्रकरणातला मुंबई तक चा खास व्हीडिओ
पूजा चव्हाण प्रकरणात काय म्हणाले संजय राठोड?
पूजा चव्हाण या तरूणीचा मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे. मात्र या मृत्यू प्रकरणावरून भाजपकडून घाणेरडं राजकारण सुरू आहे. माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. पूजा चव्हाणसोबतचे माझे फोटो व्हायरल केले जात आहेत. मात्र सामाजिक जीवनात अनेक माणसं भेटत असतात त्यांच्यासोबत फोटो असणं हे काही विशेष नाही. या प्रकरणावरून माझी, माझ्या कुटुंबीयांची आणि माझ्या बंजारा समाजाची बदनामी करू नका. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल.