Shiv sena VBA Alliance : उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आज करणार घोषणा

मुंबई तक

22 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:14 AM)

Shiv Sena (UBT) and Vanchit Bahujan Aghadi alliance in maharashtra मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी (Balasaheb Thackeray Birth anniversary) राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येणार आहे. सोमवारी (२३ जानेवारी) शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) एकत्र येणार असल्याची घोषणा होणार आहे. शिवसेना (UBT) नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी माहिती दिली असून, आज […]

Mumbaitak
follow google news

Shiv Sena (UBT) and Vanchit Bahujan Aghadi alliance in maharashtra

हे वाचलं का?

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी (Balasaheb Thackeray Birth anniversary) राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येणार आहे. सोमवारी (२३ जानेवारी) शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) एकत्र येणार असल्याची घोषणा होणार आहे. शिवसेना (UBT) नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी माहिती दिली असून, आज याची औपचारिक घोषणा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार आहेत. (will be announced that Shiv Sena (UBT) and Vanchit Bahujan Aghadi will come together)

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (UBT)-वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकाही पार पडल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी या आघाडीबाबत अनेकदा भाष्य केलं आहे.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद सोमवारी (23 जानेवारी) दुपारी 1 वाजता दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये होणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एकाच व्यासपीठावर आले होते. प्रबोधनकार.कॉम’ या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही एकत्र दिसून आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचे संकेत दिले होते.

आमच्या दोघांचं वैचारिक व्यासपीठ एकच :

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, आज मला आनंद आहे, अभिमान आहे. असं काही नाही की माझी आणि प्रकाशजींची ओळख नाही. बोलतो. मध्ये-मध्ये भेटलेलोही आहे. पण त्यांच्यासोबत भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा याला मिनिटांचं गणित नाही.

आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमच्या दोघांचही एकचं आहे. ते एक असल्यामुळे आम्हाला दोघांनाही एकत्र येण्यात अडचण आली नाही, आणि ज्याची अपेक्षा लोकांना आहे, तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे एकत्र घेऊन चाललो आहोत.

    follow whatsapp