हिवाळी अधिवेशन: अजितदादा भडकले, CM शिंदेंचा हल्ला; पाहा अधिवेशनात काय घडलं

Winter Session Maharashtra: नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Winter Session) तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच काही मुद्द्यांनी डोकं वर काढल्यानं सरकारला खिंडीत पकडण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी इरादे स्पष्ट केले असून, अधिवेशनात सरकारला घेरण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस […]

Mumbai Tak

मुंबई तक

19 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:32 AM)

follow google news

Winter Session Maharashtra: नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Winter Session) तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच काही मुद्द्यांनी डोकं वर काढल्यानं सरकारला खिंडीत पकडण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी इरादे स्पष्ट केले असून, अधिवेशनात सरकारला घेरण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा कस लागणार असून, अधिवेशनामुळे नागपुरचा राजकीय पारा वाढला आहे. (winter session every moment of maharashtra legislative assembly live)

हे वाचलं का?

हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 डिसेंबर) सुरूवात होत आहे. विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच पवित्रा स्पष्ट केला असून, शिंदे-फडणवीसांनीही विरोधकांच्या मुद्द्यांना उत्तर देत इरादे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे.

    follow whatsapp