Sunil Prabu : तुम्हाला मंत्रिपद हवंय का? ठाकरे गटाच्या आमदाराला फडणवीसांची खुली ऑफर

मुंबई तक

19 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:32 AM)

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Winter Session) तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होत आहे. या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी आरोप आणि प्रत्युत्तराचा सामना रंगला होता. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या एका आमदार महोदयांना मंत्रीपदाची दिलेली खुली ऑफर चर्चेचा विषय ठरला. नेमकं […]

Mumbaitak
follow google news

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Winter Session) तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होत आहे. या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी आरोप आणि प्रत्युत्तराचा सामना रंगला होता. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या एका आमदार महोदयांना मंत्रीपदाची दिलेली खुली ऑफर चर्चेचा विषय ठरला.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी नागपूरमध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला केलेल्या रंगरंगोटीबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. शिंदे सरकारमध्ये आजच्या घडीला एकही राज्यमंत्री नाही. तरीही अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सजवण्यात आले, असा दावा प्रभू यांनी केला.

या बंगल्यांची आवश्यकता नसतानाही ते सजवले गेले आहेत. एका बाजूला सरकार प्रकल्पांवरती करोडो रुपयांचं कर्ज उभे करत आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारी पैशांचा चुराडा होत आहे. हा पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका सुनील प्रतोद यांनी केली. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

    follow whatsapp