मुंबईची खबर: मुंबई ते गोवा प्रवास अधिक सुकर होणार... 15 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार!

मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रोजेक्टबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत या महामार्गासाठी नव्या डेडलाइनची घोषणा केली आहे.

15 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार!

15 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार!

मुंबई तक

• 04:52 PM • 06 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आता मुंबई ते गोवा प्रवास अधिक सुकर होणार...

point

15 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार!

point

नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai News: मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागील 15 वर्षांपासून रखडलं होतं. मात्र, आता या प्रोजेक्टबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत या महामार्गासाठी नव्या डेडलाइनची घोषणा केली आहे. आता कोकण ते मुंबई प्रवास अधिक वेगवान आणि सोप्पा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना हा महामार्ग लवकरच पूर्ण होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

महामार्गाचं 89 टक्के काम पूर्ण

नितीन गडकरी यांनी माहिती देताना सांगितलं की, 2009 मध्ये सुरू झालेल्या महामार्गाचं काम 89 टक्के पूर्ण झालं आहे. तसेच, प्रकल्पाचं उर्वरित काम एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रोजेक्टबाबत महिती देताना परिवहन मंत्री म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातून जातो आणि रस्ते, महामार्ग आणि एक्स्प्रेसवे मिळून हा प्रकल्प बांधला जात आहे. 

2026 मध्ये महामार्ग प्रवाशांसाठी खुला...

हा महामार्ग पनवेल, रत्नागिरी, गोवासह इतर ग्रामीण परिसरांना सुद्धा कनेक्ट होणार आहे. हा फोर-लेन हायवे असून 2025 पूर्वी डेडलाइन निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव त्याचं बांधकाम पूर्ण होऊ शकलं नाही. आता, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून 2026 मध्ये हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. 

हे ही वाचा: प्रियकराच्या नादाला लागली अन् नको ते करून बसली! मामा-मामीसोबतच केला कांड...

कसा असेल मार्ग? 

मुंबई ते गोवा प्रवासासाठी 12 तास लागतात. आता, हा महामार्ग खुला झाल्यानंतर प्रवाशांना 12 तासांचा प्रवास केवळ 6 तासांत करता येणार आहे. हा 466 किमी लांब हायवेच्या बांधकामासाठी 7300 रुपये खर्च येणार असल्याची अपेक्षा आहे. माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड आणि चिपळूण येथे बायपास, अंडरपास आणि उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. यामुळे ही शहरे थेट कनेक्ट होणार असून वाहतूक कोंडी सुद्धा कमी होईल.

हे ही वाचा: Govt Job: तब्बल 1.20 लाखांहून अधिक उमेदवारांना रेल्वेत नोकरी! रेल्वे मंत्र्यांनीच दिली महत्त्वाची माहिती...

या हायवेसह पुणे-कोल्हापूर मार्ग आणि धुळे-पिंपळगाव मार्गाबाबत सुद्धा चर्चा झाली. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे-पिंपळगाव चार पदरी रस्ता सहा लेनमध्ये अपग्रेड करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, पुणे-कोल्हापूर मार्ग एका वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp