पुण्याला येत असलेल्या महिलेनं धावत्या बसमध्ये बाळाला दिला जन्म

कर्नाटकातील देवदुर्ग येथून पुण्याला येत असलेल्या एका महिलेनं धावत्या बसमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. बारामतीतील निरा येथून बस जात असतानाच महिलेची प्रसुती झाली. त्यानंतर आई आणि बाळाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, दोघंही सुखरुप आहेत. बसमध्ये असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी घटनेबद्दलची माहिती दिली. 20 वर्षीय ज्योती सोमनाथ चव्हाण पुण्यातील भोसरी येथे आपल्या पतीसोबत राहतात. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:17 AM • 25 Oct 2021

follow google news

कर्नाटकातील देवदुर्ग येथून पुण्याला येत असलेल्या एका महिलेनं धावत्या बसमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. बारामतीतील निरा येथून बस जात असतानाच महिलेची प्रसुती झाली. त्यानंतर आई आणि बाळाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, दोघंही सुखरुप आहेत.

हे वाचलं का?

बसमध्ये असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी घटनेबद्दलची माहिती दिली. 20 वर्षीय ज्योती सोमनाथ चव्हाण पुण्यातील भोसरी येथे आपल्या पतीसोबत राहतात. काही दिवसांपूर्वी ज्योती चव्हाण कर्नाटकातील मानवी तालुक्यात असलेल्या मुरामपुरतांडा येथे राहणाऱ्या आपल्या आईवडिलांकडे गेल्या होत्या. ज्योती या बाळंतपणासाठीच माहेरी गेल्या होत्या.

माहेरी गेल्यानंतर ज्योती या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्या. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सीझर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ज्योती यांच्या वडिलांनी त्यांना पुन्हा पुण्याला आणण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री (23 ऑक्टोबर) दोघेही पुण्यासाठी रवाना झाले.

आई-वडिलांचं भांडण सोडवायला गेलेल्या सावत्र मुलाचा कोयत्याने वार करत खून

कर्नाटक एसटी महामंडळाच्या गाडीतून दोघेही पुण्याकडे येत असताना बारामतीजवळ ज्योती यांना त्रास सुरू झाला. ज्योती यांना प्रसवकळा सुरू झाल्यानंतर बसमधील काही स्त्रियांनी एकत्र येत बसमध्येच त्यांची प्रसुती केली.

प्रसुती सुरू असतानाच बस चालकाने 108 या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली. त्यानंतर महिला आणि बाळाला तातडीने निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलं. तिथे डॉक्टर समीक्षा कांबळे यांनी महिलेवर उपचार केले. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

काळीज पिळवटून टाकणारी घटना, पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नसल्याने पतीची आत्महत्या

दरम्यान, धावत्या बसमध्ये महिलेची प्रसुती करणाऱ्या लक्ष्मी पवार, नागेश्वरी पवार आणि रीमा राठोड याचं कौतुक केलं जात आहे, तर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर बस पुण्यासाठी रवाना झाली.

    follow whatsapp