Mumbai Crime : मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ट्यूशन टीचरने आठ वर्षाच्या लहान मुलाच्या हातावर चटके दिले आहेत. ट्यूशन टीचरने लहान मुलाला दिलेल्या या शिक्षेमुळे गुरू आणि शिष्याच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले जातील. शिक्षेचं कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. मुलाचे हस्ताक्षर खराब असल्याच्या कारणावरून त्याच्या हाताला चटके दिले होते. दरम्यान, आरोपी ट्यूशन टीचरचे नाव राजश्री राठोड असे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शनि आणि बुध वक्रीमुळे काही राशीतील लोकांच्या आयुष्याला मिळेल कलाटणी, जागतिक पातळीवर होईल उलाढाल
नेमकं काय घडलं?
राजश्री राठोडने मुलाचे हस्ताक्षर खराब आल्याने मेणबत्तीने हातावर चटके दिले. या अशा शिक्षेमुळे पीडित विद्यार्थ्याच्या हाताला जखम झाली आहे. या प्रकरणात लहान मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ट्यूशन टीचरच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा गोरेगाव येथील इयत्ता तिसरीत शिकत आहे. तो मालाड येथील राजश्री राठोड नावाच्या ट्यूशन टीचरकडे शिकवणीसाठी जातो. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हाच त्याची बहीण त्याला ट्यूशनला सोडवायला गेली होती. त्याच दिवशी ट्यूशन टीचरने मुलाच्या बहिणीला फोन केला आणि आपल्या भावाला घेऊन जा असे सांगितले.
जेव्हा मुलाची बहीण आपल्या भावाला न्यायला आली असता, पीडित मुलगा रडत होता. त्याच्या हाताला गंभीर स्वरुपाचे चटके देण्यात आले होते. जेव्हा पीडितेच्या बहिणीने संबंधित प्रकरणाबाबत विचारले असता, ट्यूशन टीचर दुर्लक्ष करू लागली होती. त्यानंतर मुलगा घरी गेल्यानंतर आपल्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. लहान मुलाची परिस्थिती पाहता त्याला कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडित मुलाच्या वडिलांचा संताप म्हणाले...
तक्रारदार पीडित मुलाच्या वडिलांनी दावा केला की, लहान मुलाला अशी अमानुषपणे शिक्षा देणे केवळ शारीरिक छळच नसून मानसिक छळ देखील आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिका राजश्री राठोडविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पावसाचा लपंडाव, तर दुष्काळी भागात मान्सूनचा येलो अलर्ट जारी
आरोपी शिक्षक यापूर्वीही मुलांना कठोर शिक्षा देत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे आणि तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
