काकाची वासना बळावली, पुतणीवरच केली बळजबरी... हात जोडले तरी नाही ऐकलं!

बिहारमधील भागलपुर जिल्ह्यात एका गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने बलात्कार केल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे.

11 year old niece brutally raped by her uncle Even though she was crying screaming and pleading with folded hands the man tortured her

uncle rape his minor Niece, rape on minor Niece, Crime News, Rape Case, Rape on minor niece by uncle,

मुंबई तक

31 Jul 2025 (अपडेटेड: 01 Aug 2025, 07:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

11 वर्षीय अल्पवयीन भाचीवरच केला बलात्कार

point

भाचीलाच बनवलं वासनेची बळी

point

हाथ जोडून विनवण्या केल्या तरीही निर्दयीपणे अत्याचार

Rape Case: बिहारमधील भागलपुर जिल्ह्यात नातेसंबंधाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या जिल्ह्यातील नाथनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने बलात्कार केल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी (29 जुलै) सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पीडित मुलगी जोरजोरात ओरडत असताना स्थानिक लोकांना या प्रकरणाबाबत कळालं. 

हे वाचलं का?

पीडित मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितेच्या काकाला पडकण्यात आलं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाथनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी तिथे पोहचले आणि त्यांनी लगेच आरोपीला अटक केली. 

भाचीवरच केला बलात्कार 

या प्रकरणासंदर्भात पीडितेच्या वडिलांनी नाथनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बागेत फूलं तोडण्यासाठी जात होती. आरोपी सुद्धा आधीच बागेत उपस्थित होता. आरोपी नात्याने पीडित मुलीचा काका लागत असून बागेत गेलेल्या अल्पवयीन त्या मुलीवर त्याची घाणेरडी नजर पडली. आरोपीने नात्याचा आणि वयाचा काहीच विचार न करता तिच्यासोबत घृणास्पद केलं. त्यावेळी पीडित मुलगी जोरजोरात ओरडत होती, इतकेच नव्हे तर तिने आरोपीला हात जोडून विनंती देखील केली. मात्र, आरोपीने कशाचाही विचार न करता तिच्यावर बलात्कार केला. 

हे ही वाचा: Shailesh Jejurikar: P&G कंपनीच्या मोठ्यापदावर मराठमोळा माणूस, पहिल्यांदाच भारतीय बनणार CEO; किती मिळणार पगार?

पीडितेच्या मते, तिने त्या नराधमापासून स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अडीच वर्षांपूर्वी त्याच गावातील एका मुलीसोबत असंच घाणेरडे कृत्य केलं होतं. परंतु त्यावेळी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती.

हे ही वाचा: Malegaon Blast Case: 17 वर्षांची प्रतीक्षा, स्फोट, मृत्यू... आणि तपासही फिरला, A टू Z स्टोरी

पोलिसांचा तपास 

घटनेची माहिती मिळताच डीएसपी एफएसएल टीमसोबत घटनास्थळी पोहचले. त्यांनी संबंधित ठिकाणावरुन काही नमुने, पुरावे गोळा केले. नाथनगरच्या पोलीस निरीक्षकांनी प्रकरणाची माहिती देताना आरोपीला अटक करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच, पीडितेला वैद्यकीय तपासणी आणि जबाब नोंदवण्यासाठी महिला पोलिस ठाण्यात पाठवण्यात आलं आहे. पूर्ण अहवाल समोर आल्यानंतरच हे प्रकरण खरे आहे की नाही? हे स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

    follow whatsapp