कुऱ्हाडीने गळा चिरला अन् नंतर छातीवर वार... संतापलेल्या पतीने झोपलेल्या अवस्थेत पत्नीची केली हत्या!

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात पतीने रात्री झोपलेल्या अवस्थेत असताना पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. आरोपीने आधी पत्नीचा गळा चिरला इतकेच नव्हे तर त्यांनंतर त्याने पत्नीच्या छातीवर देखील वार केले. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.

संतापलेल्या पतीने झोपलेल्या अवस्थेत पत्नीची केली हत्या!

संतापलेल्या पतीने झोपलेल्या अवस्थेत पत्नीची केली हत्या!

मुंबई तक

• 01:21 PM • 31 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कुऱ्हाडीने वार करत झोपलेल्या पत्नीची हत्या

point

आधी गळा चिरला अन् नंतर छातीवर वार...

point

नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Crime News: बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना झखराच्या पीपरटकोठी परिसरातील बलिया टोलामध्ये घडल्याची माहिती आहे. पत्नीच्या माहेरी गेलेल्या पतीने रात्री झोपलेल्या अवस्थेत असताना पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. आरोपीने आधी पत्नीचा गळा चिरला इतकेच नव्हे तर त्यांनंतर त्याने पत्नीच्या छातीवर देखील वार केले. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

हत्येमागे प्रेमसंबंध असल्याचा संशय 

घटनेत मृत पावलेल्या महिलेचं नाव मानती देवी असल्याचं समोर आलं आहे. तसेच, प्रकरणातील आरोपी सुबोध मांझीला पोलिसांनी अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. सुबोध नेहमी बाहेर राहुन मजूरी करत होता. या हत्येच्या प्रकरणामागे प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, घटनेच्या दिवशी दोघे पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हत्येमागचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कुऱ्हाडीने वार करत हत्या   

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुबोध घटनेच्या पाच दिवसांपूर्वी आपल्या पत्नीच्या माहेरी राहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो घरातील सगळ्यांशी प्रेमाने वागत होता. मंगळवारी (29 जुलै) तो सगळ्यांसोबत घराबाहेरील अंगणात झोपला. त्यावेळी घरातील सदस्य झोपल्यानंतर रात्री उशीरा आरोपीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. 

हे ही वाचा: मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 35 वर्षीय शेजाऱ्याने पार्किंग लॉटमध्ये नेलं अन्...

कुटुंबीय जागे झाल्यानंतर आरोपी फरार 

सुबोधने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर तिच्या मानेतून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्यावेळी शेजारी झोपलेल्या मानतीच्या बहिणींच्या चेहऱ्यावर रक्ताचे थेंब पडले आणि त्यावेळी दोघी बहिणी जाग्या झाल्या. मात्र, तेव्हा दोघींना त्यांच्या दाजीने मानतीवर कुऱ्हाडीने वार केल्याचं दिसलं. दोघींनी जोरजोरात ओरडून कुटुंबियांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेवढ्यात आरोपी सुबोध तिथून पळून गेला. 

हे ही वाचा: ब्रेकअप झाला अन् 2 महिन्यांतच केलं दुसऱ्या महिलेला गरोदर! म्हणाली, "मला सावत्र आई बनायला..."

पोलिसांचा तपास 

प्रकरणातील मृत पावलेली महिला मागील 6 महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत असून तिला एक 4 वर्षांचा मुलगा असल्याची माहिती आहे. घटनेत वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली असून मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. 

    follow whatsapp