मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 35 वर्षीय शेजाऱ्याने पार्किंग लॉटमध्ये नेलं अन्...

मुंबई तक

मुंबईतील भायखळा परिसरातील एका गगनचुंबी इमारतीत एका 16 वर्षीय मुलीवर 35 वर्षीय पुरूषाने शारीरिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

point

35 वर्षीय शेजाऱ्याने 16 वर्षीय तरुणीवर केला शारीरिक अत्याचार

Mumbai Crime: सध्या राज्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातंच आता मुंबईतील प्रतिष्ठित परिसरात देखील अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. भायखळा परिसरातील एका गगनचुंबी इमारतीत एका 16 वर्षीय मुलीवर 35 वर्षीय पुरूषाने शारीरिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. 

तब्बल चार महिने शारीरिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पीडिता वास्तव्यास असलेल्या इमारतीत राहत असून त्याने आधी पीडित मुलीशी मैत्री केली आणि तब्बल चार महिने इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. पीडितेच्या वडिलांनी यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी एफआयआर नोंदवून संबंधित आरोपीला भायखळा परिसरातच अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: Malegaon Blast Case: 17 वर्षांची प्रतीक्षा, स्फोट, मृत्यू... आणि तपासही फिरला, A टू Z स्टोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे कुटुंबिय इमारतीच्या 45 व्या मजल्यावर राहत असून तर आरोपी त्याच इमारतीच्या 48 व्या मजल्यावर राहत असल्याची माहिती समोर आली आहे.  या प्रकरणात पुरावा म्हणून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं देखील सांगितलं आहे.

हे ही वाचा: ब्रेकअप झाला अन् 2 महिन्यांतच केलं दुसऱ्या महिलेला गरोदर! म्हणाली, "मला सावत्र आई बनायला..."

आधी मैत्री अन् नंतर पार्किंग लॉटमध्ये नेऊन...

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे 27 फेब्रुवारी ते 28 जून दरम्यान, आरोपीने पीडित मुलीशी मैत्री केली. त्यानंतर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये त्याने तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, बिल्डिंगमधील इतर लोकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत आरोपीने पीडितेला त्याच्या फ्लॅटमध्ये नेले आणि तिच्यावर लाऊंज रुममध्ये हल्ला केल्याचं देखील सांगितलं जात आहे. प्रकरणासंदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp