मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा मोठा निर्णय

malegaon bomb spot : देशातील सर्वात महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. मालेगाव बॉस्मस्फोटात झालेल्या आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

malegaon bomb spot

malegaon bomb spot

मुंबई तक

31 Jul 2025 (अपडेटेड: 31 Jul 2025, 01:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

देशातील सर्वात महत्त्वाची अपडेट

point

मालेगाव बॉस्मस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

malegaon bomb spot : देशातील सर्वात महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. 2008 मालेगाव बॉस्मस्फोटात झालेल्या आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती, त्यानंतर काही दिवस उलटताच न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आज 31 जुलै रोजी सकाळी न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. 

हे वाचलं का?

निकालात काय म्हटलं? 

एनआयए न्यायलयाने आपल्या निकालात म्हटलं की, सरकारी वकिलांना केस सिद्ध करण्यास अपयश आलं आहे. न्यायाधीशींनी पुढं सांगितलं की, ज्या बाईकला हे बॉम्ब बांधण्यात आले होते, ती दुचाकी प्रज्ञा ठाकूरची असल्याचं वकिलांनी सिद्ध केलेलं नाही. एक हजार पानांचं निकालपत्र न्यायालयाने जारी केलं आहे. अशातच संबंधित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

29 सप्टेंबर 2008 मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बॉस्मस्फोटात एकूण 10 जणांचा मृ्त्यू झाला होता. तसेच या बॉम्बस्फोटात एकूण 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. आझाद नगर पोलीस ठाण्यात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच एप्रिल 2011 मध्ये, गृह मंत्रालयाने स्वत:हून एनआयएला या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचे निर्देश दिले होते. 

त्यानंतर मे 2016 मध्ये, एनआयएने आरोपपत्राची दुसरी पुरवणी दाखल केली होती. त्यात भाजपचे माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रवास पुरोहित, निवृत्त असलेले मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याविरोधात मोककोचा आरोप रद्द केला होता. 

दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये, विशेष न्यायाधीश एस.डी. टेकाळे यांनी मकोकाचे आरोप रद्द केले आणि भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्र कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली आरोपपत्र दाखल केले. आता हेच सर्व आरोपी जामिनीवर आहेत, अशी माहिती द हिंदू या वृत्त माध्यमाने दिली आहे.

    follow whatsapp