‘मविआ’च्या विरोधात भाजपची वंचितला साथ; काय घडलं निवडणुकीत?

अकोला : जिल्हा परिषदेमध्ये भाजपमध्ये फुट पडल्याच समोर आलं आहे. शनिवारी झालेल्या सभापतीपदांसाठीच्या निवडणुकीत भाजपच्या ५ सदस्यांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचा अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र तरीही भाजपच्या ३ सदस्यांनी व्हीप डावलून महाविकास आघाडीला तर दोनच सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं. दरम्यान, भाजपच्या ३ सदस्यांनी व्हीप डावलल्यानंतर देखील चारही सभापतीपदांवर वंचित […]

Mumbai Tak

मुंबई तक

29 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

follow google news

अकोला : जिल्हा परिषदेमध्ये भाजपमध्ये फुट पडल्याच समोर आलं आहे. शनिवारी झालेल्या सभापतीपदांसाठीच्या निवडणुकीत भाजपच्या ५ सदस्यांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचा अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र तरीही भाजपच्या ३ सदस्यांनी व्हीप डावलून महाविकास आघाडीला तर दोनच सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं.

हे वाचलं का?

दरम्यान, भाजपच्या ३ सदस्यांनी व्हीप डावलल्यानंतर देखील चारही सभापतीपदांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. वंचितच्या उमेदवारांना 27 तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 26 मतं मिळाली. वंचितला 2 अपक्षांचीही साथ मिळाली. वंचितच्या विजयी उमेदवारांमध्ये महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी रिजवाना परवीन, समाजकल्याण सभापतीपदी आम्रपाली खंडारे, विषय समितीच्या सभापती पदांवर माया नाईक आणि योगिता रोकडे विजयी झाल्या आहेत.

१५ दिवसांपूर्वी अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपचे पाचही सदस्य अनुपस्थित राहिले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना 25 तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 23 मतं मिळाली होती. त्यात अध्यक्षपदी संगीता अढाऊ व उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी झाले आहेत.

अकोला जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 53

  • वंचित बहुजन आघाडी : 23

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 12

  • भाजप : 05

  • काँग्रेस : 04

  • राष्ट्रवादी : 04

  • प्रहार : 01

  • अपक्ष : 04

आजच्या निकालाचे बलाबल :

वंचित बहुजन आघाडी + भाजप दोन + अपक्ष दोन = 27

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष दोन + भाजप तीन = 26

    follow whatsapp