घाटकोपरनंतर दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्या, मनसेने कुठला इशारा दिला?

dadar white stripes : दादरमध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर संबंधित पट्ट्या मिटवण्यात आल्याने हा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.

मुंबई तक

13 Jun 2026 (अपडेटेड: 13 Jun 2026, 08:49 PM)

follow google news

dadar white stripes : मुंबईतील घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला आहे. घाटकोपरमध्ये ज्या प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्यांवरून मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाले होते, त्याच धर्तीवरील पट्ट्या दादरमधील काही रस्त्यांवरही रंगवण्यात आल्याचे समोर आले. मात्र वाद वाढल्यानंतर त्या पट्ट्यांवर दुसरा रंग देऊन त्या मिटवण्यात आल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे घाटकोपरनंतर दादरमध्येही हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : राजघराण्यातील व्यक्तीने दोन बायका केल्या, एकीने दुसरीवर गोळ्या झाडल्या

मनसेचा निर्वाणीचा इशारा 

या प्रकरणावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संबंधित पट्ट्या निश्चित मुदतीत हटवाव्यात, अन्यथा पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर बीएमसीचे कर्मचारी आणि स्थानिक स्तरावरील संबंधित घटकांनी पुढाकार घेत या पट्ट्या बुजवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे पांढऱ्या पट्ट्या दिसत नसून त्यावर वेगळा रंग देण्यात आला आहे.

हेही वाचा : पत्नी प्रियकरासोबत जात होती, नवऱ्याने रस्त्यात गाठलं अन्... 

जैन मुनींच्या आगमनावेळी रंगवण्यात येतात पट्ट्या

दादर परिसरात जैन समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून त्यांच्या मंदिराच्या परिसरात आणि आसपासच्या भागात हे रंगकाम करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जैन मुनींच्या आगमनावेळी अशा प्रकारच्या पट्ट्या रंगवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जाते. मात्र सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारचे रंगकाम करण्यास परवानगी होती का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

या संपूर्ण वादात दोन्ही बाजूंकडून आपापली भूमिका मांडली जात आहे. मनसेने या प्रकाराला "सांस्कृतिक दहशतवाद" असे संबोधत विरोध दर्शवला होता, तर दुसरीकडे हा समाजातील पारंपरिक रितीरिवाजांचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. याआधीही या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता संबंधित पट्ट्या बुजवण्यात आल्या असल्या तरी हा वाद इथेच थांबणार की पुढे आणखी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.