मुंबई: महाराष्ट्रात सध्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, या रणधुमाळीतही अवघ्या राज्याचं लक्ष हे मुंबई महापालिका आणि ठाकरे बंधूंकडे लागून राहिलं आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान होणार आहे. याच महापालिका निवडणुकीत 'ठाकरे ब्रँड' काय कमाल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण आतापर्यंत जे कधीही घडलं नव्हतं ते पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीत घडतंय. ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती. याचबाबत राज ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वाची नेमकी लढाई कशी? या सगळ्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई Tak च्या महाचावडीवर त्यांची सडेतोड आणि रोखठोक मंत मांडली आहे. हीच मुलाखत आपल्याला लवकरच मुंबई Tak वर पाहता येईल.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना UBT आणि मनसे या दोन्ही पक्षांना मोठं अपयश आलं. अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक ही या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हटलं जात आहे. कारण त्यांच्यासमोर यावेळी भाजपसारखा बलाढ्य पक्षाचं आव्हान आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही शड्डू ठोकला आहे. अशावेळी मुंबईची सत्ता मिळविण्यासाठी नेमकी रणनीती काय असणार याबाबत राज ठाकरे हे पहिल्यांदाच 'मुंबई Tak च्या महाचावडी'वर व्यक्त झाले आहेत.
मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व टिकावं यासाठी आम्ही आमचं भांडणं विसरून एकत्र आलो आहोत असं म्हणत राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता मुंबईचा मराठी मतदार या दोन्ही भावांच्या पदरात कसं दान टाकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय मुंबईच्या विकासाचं व्हिजन कसं असेल याबाबतही राज ठाकरे यांनी 'मुंबई Tak च्या महाचावडी'वर त्यांची मतं व्यक्त केली आहेत.
राज ठाकरे यांनी मुंबई Tak च्या टीमसोबत एक्स्क्लुझिव्ह गप्पा मारल्या. शिवतीर्थ या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही महाचावडी पार पडली. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि संपूर्ण टीमशी गप्पा मारताना राज ठाकरेंनी मनसेची आगामी निवडणुकीत नेमकी काय भूमिका असेल तसंच मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा नेमकं राजकारण कसं असेल हे देखील सांगितलं.
कुठे आणि कधी पाहता येईल राज ठाकरेंची महाचावडी?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाचावडी ही आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. ही संपूर्ण मुलाखत आपल्याला उद्या (9 जानेवारी 2026) सकाळी 9.00 वाजता पाहता येईल.
पाहा राज ठाकरेंच्या महाचावडीचा Super Exclusive प्रोमो
ADVERTISEMENT











