Aaditya Thackeray, Mumbai : "मराठी माणसांना ते मांसहार करत असल्यामुळे घर नाकारलं जातं. तुम्ही मटण खाता,घाणेरडे आहात, असं म्हणत मुंबईतील काही भागात मराठी माणसांना घर नाकारलं जातं. यावर का बोललं जात नाही?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत होणाऱ्या हिंसाचाराबाबत आदित्य ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते India Today Conclave मध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुलाच्या शिक्षणाच्या फीसचं टेन्शन, अतिवृष्टीने फास आवळला, बार्शीतील दोन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
काही हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी लोकांना प्रवेश दिला जात नाही- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे म्हणाले, हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी असल्याने प्रवेश दिला जात नाही. मराठी माणसांनी हिंदी भाषिकांना मारहाण केली, ही एकच बाजू का दाखवली जाते? हिंसाचाराला दोन्ही बाजूंनी विरोध व्हायला हवा. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांना नियंत्रित करु शकत नाही. मी आमच्या लोकांच्या भावनांना नियंत्रित करु शकत नाही. हे प्रत्येक राज्यात घडतं हे लक्षात घ्या.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, वरळी हा माझा मतदारसंघ आहे. वरळीत संपूर्ण देशातून लोक येतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं येतात. येथे येऊन संसार सुरु करतात, नोकरी शोधतात. मुंबईची संस्कृती प्रत्येकाचं स्वागत करते. गेल्या 50 वर्षांपासून मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. असं असताचा मुंबईत सर्वांचं स्वागत होत राहिलंय. मुंबईत महिला सुरक्षित आहेत. मुंबईत हिंदी सिनेमाही वाढलाय.
निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने पक्षाचं चिन्ह शिंदेंना दिलं - ठाकरे
एकनाथ शिंदेंबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोणी चोरी केली असेल म्हणून एखादी गोष्ट त्याची होत नाही. तो प्रत्येक गोष्टीवर दावा करु शकत नाही. या देशात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. जो माणूस सूरत आणि गुवाहाटीला पळून गेला, त्याला निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने पक्षाचं चिन्ह दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे..मी सर्वोच्च न्यायालयाचा आदर करुन बोलतो. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस गेल्या तीन वर्षांपासून पेंडिंग आहे. राजकाराच्या बाबतीत ही देशातील सर्वांत मोठी केस आहे. दोन पक्षात फुट पडली, त्यांनी सत्ताधारी पक्षाशी युती केली. हे शेड्युल्ड 10 चं उल्लंघन आहे. भटक्या कुत्र्यांबाबत सुमोटो केस घेतली जाते. पण आमच्या केसवर सुनावणी होत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
