ऑपरेशन टायगरनंतर.. आणखी मोठा भूकंप घडवणार शिंदे? स्टेजवरून स्वत:च दिली मोठी हिंट

मुंबई तक

• 10:35 PM • 19 Jun 2026

ऑपरेशन टायगरनंतर ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असताना. शिवसेनेच्या वर्धापन दिनी बोलताना एकनाथ शिंदेंनी एक मोठं विधान केलं आहे.

after operation tiger is something else big about to happen eknath shinde himself dropped a major hint

एकनाथ शिंदे

Google CTA

मुंबई: शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा 60 वा वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज (19 जून) पार पडला. यावेळी पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरबाबत बोलताना एक मोठं विधान केलं आहे. नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यात शिंदेंना यश आलं आहे. पण हा केवळ ट्रेलर आहे. संपूर्ण सिनेमा अजून बाकी आहे. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी एक मोठी हिंट दिली आहे. 

हे वाचलं का?

ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर आता त्यांचे आमदार देखील शिंदेंकडून फोडले जातील असा कयास राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. त्यातच आता स्वत: शिंदेंनी देखील तशाच प्रकारची हिंट दिल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. पाहा शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले.

'आगे आगे देखो होता है क्या..', एकनाथ शिंदेंचं भाषण

'बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. एकनाथ शिंदे काय बोलणार, व्यासपीठावर कोण-कोण बोलणार.. काय होणार? अरे आज ये टायगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय.. काल-परवापासून कुछ कुत्ते रोज भौंक रहे है.. पण मी तुम्हाला सांगतो.. कुत्ते झुंड मैं आके भौंकते है.. शेर अकेला आता है. कुत्ते भौंकते रहते है.. टायगर शिकार करता रहता हैं. ही शिवसेना आहे. हीच शिवसेना आज महाराष्ट्रात आपण पाहतोय.. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय.'

'ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! आगे आगे देखो होता है क्या.. आपली शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्म झाला. महाराष्ट्राची अस्मिता म्हणून शिवसेना उभी राहिली. हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना..'

'बाळासाहेबांच्या मनासारखं, त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतोय. त्यामुळे त्यांना नक्कीच स्वर्गात आनंद वाटत असेल. हेच आपलं भाग्य आहे. हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही, तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात.'

हे ही वाचा>> Big Breaking: पक्षप्रमुख पद सोडण्याबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, शिवसेना UBT च्या मेळाव्यातील हायव्होल्टेज बातमी

'शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही तर शिवसेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या-तुमच्या काळजाचा तुकडा आहे. शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष नाही तर भगवं वादळ आहे. जो भगव्याला विसरला, तो राजकारणातून संपला.. हे आपण पाहिलं आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. खुर्चीसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलं.'

हे ही वाचा>> Operation Tiger: महायुतीत एकनाथ शिंदे कसे झाले यशस्वी त्याची Inside Story.. उद्धव ठाकरे कुठे राहिले गाफील?

'अरे.. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना त्रास दिला, त्यांना छळलं.. पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता त्यांचा पुरस्कार तुम्ही करताय. ही तुमची वारसदारी.'

'ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्याचं काम केलं, जीवापाड प्रेम केलं.. त्यांना तुम्ही शिव्या देता हा कोणता न्याय? शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने.. दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने... त्यांच्यासाठी ओव्या गातायेत.. आणि ज्यांनी धनुष्यबाण गहाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं त्यांना शिव्या देता. आपण 4 वर्षापूर्वी उठाव केला आपला उठाव सुपरहिट झाला. महाराष्ट्रातील तमाम जनतेने तो स्वीकारला. म्हणून आपण जनतेच्या न्यायालयात जिंकलो.' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.