दीपके, रांका आणि दास यांना अटक, आंदोलनाची पुढील धुरा सांभाळणार मराठी मुलगा

मुंबई तक

10 Oct 2026 (अपडेटेड: 10 Oct 2026, 01:52 PM)

Ajinkya Shinde CJP : अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर आंदोलनाची पुढील दिशा आणि धुरा नेमका कोण सांभाळणार?

Ajinkya Shinde CJP

Ajinkya Shinde CJP

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तिघांच्या अटकेनंतर मराठी मुलगा सांभाळणार आंदोलनाची धुरा

point

काँग्रेस पक्षाची आंदोलनाला पाठ 

Ajinkya Shinde CJP : कॉकरोच जनता पार्टीने लोकशाही वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्या त्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नुकत्याच हाती आलेल्या एका वृत्तानुसार, अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर आंदोलनाची पुढील दिशा आणि धुरा नेमका कोण सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर तिघांच्या अटकेनंतर पुढील आंदोलनाची दिशा सांभाळणारा अजिंक्य शिंदे हा मराठी तरुण आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : पोलीस विमानात शिरले अन् एकच गोंधळ, घोषणाबाजी; दिपकेंना ताब्यात घेताना विमानात नेमकं काय घडलं? VIDEO

घटनास्थळी संवेदनशील स्थिती 

 दरम्यान, दिल्लीत सध्या सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जवळपास तब्बल 25 हजार पोलीस आणि निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. 45 मेट्रो स्थानकांवर प्रवेश आणि निर्गमनावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीच्या सीमा, रेल्वे स्थानक बस टर्मिनल्स आणि इतर संवेदनशील स्थळी सुरक्षा आणि निगराणी वाढवण्यात आली. 

हे ही वाचा : मोठी बातमी! अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात; दिल्ली विमानतळावर नाट्यमय घडामोडी

काँग्रेस पक्षाची आंदोलनाला पाठ 

या आंदोलनाला काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्यात येईल अशी शक्यता होती, मात्र त्यांनी पाठिंबा दिलेला नाही. या आंदोलनाची संभाव्य अटकेची परिस्थिती लक्षात घेत अजिंक्य शिंदे ही आंदोलनाची पुढील धुरा सांभाळणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना ताब्यात घेतले, सरन्यायाधीशांच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. 

कोण आहे अजिंक्य शिंदे? 

अजिंक्य शिंदे हा कॉकरोच जनता पार्टीचा राष्ट्रीय संघटना प्रभारी पदावर काम करतो. मुंबईत यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाचा तो आयोजक होता. कॉकरोज जनता पार्टीतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहे.