विरोध करायचा असेल तर खुलेपणाने करा, आमच्यासोबत राहून गद्दारी करू नका, अजित पवारांचा माळेगावातून इशारा

Ajit Pawar : विरोध करायचा तर खुलेपणाने करा, आमच्यासोबत राहून गद्दारी करू नका, अजित पवारांनी ठणकावले

Ajit Pawar

Ajit Pawar

मुंबई तक

01 Dec 2025 (अपडेटेड: 01 Dec 2025, 09:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'विरोध करायचा असेल तर खुलेपणाने करा'

point

'आमच्यासोबत राहून गद्दारी करू नका'

point

अजित पवारांनी ठणकावले

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातल्या माळेगाव नगरपंचायतीच्या सांगता सभेच्या निमित्ताने विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे. विरोध करायचा तर खुलेपणाने करा. उगाच पाठीमागे विरोध करून गद्दारी करू नका, विरोधकांचा समाचार घेतलाय. "लोकांना वाटतं आम्ही काय करतो ते याला काही कळत नाही, पण कोण कोण काय काय करताय? हे सगळं मला समजतं. कोणाला वेगळी भूमिका घ्यायची असेल तर खुलेपणाने घ्यावी. उगाच आमच्या सोबत राहून गद्दारी करू नये, असं म्हणत अजित पवारांनी पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्यांना ठणकावले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : “मुलगा बीडचा आहे, लग्न करू नको..” तरुणाने तिला संपवलं, घराला लॉक लावून त्यानं ट्रेनखाली जीव दिला, घटनेनं पुणे हादरलं

माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा पुरस्कृत जनमत विकास आघाडीच्या वतीनं आयोजित निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. माळेगावच्या विकासासाठी या निवडणुकीत उभ्या केलेल्या आमच्या सर्व उमेदवारांना माळेगावकरांचं पाठबळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचा गाडा पुढे जात असतो, प्रश्न सुटत असतात, हे आम्ही लक्षात ठेवून आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचं अनुकरण आम्ही करतो. अंडरग्राउंड ड्रेनेज, अरुंद रस्ते, गोरगरिबांसाठी घरकुल कार्यक्रम आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत. पुढील ५ वर्षांकरिता जनमत विकास आघाडीला माळेगावकरांच्या मजबूत पाठिंब्याची गरज आहे. केंद्र आणि राज्यातल्या योजना, जिल्हा वार्षिक योजना, CSR फंड ह्या सगळ्यांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. जनकल्याणासाठी आम्ही स्वतःला समर्पित केलेलं आहे. त्यामुळे माळेगावकरांनी त्यांचं पवित्र असं बहुमोलाचं मत येत्या २ डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून आमच्या १८ उमेदवारांना द्यावं, असं आवाहन केलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'मंत्रिमंडळात आता जागाच...', जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, चर्चेला पूर्णविराम

    follow whatsapp