'कुणीही मिरवणुका काढू नयेत, गुलाल...', सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

मुंबई तक

04 May 2026 (अपडेटेड: 04 May 2026, 12:34 PM)

Sunetra Pawar : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत जवळपास सुनेत्रा पवार विजयी होणार आहेत, यात कोणतीही शंका व्यक्त केली जात नाही, अशातच आता सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना ट्विट करत भावनिक साद घातली.

Sunetra Pawar

Sunetra Pawar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

point

सुनेत्रा पवार यांचं ट्विट जसंच्या तसं 

Sunetra Pawar : 'आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया,' असं ट्विट करत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणूक उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Baramati Bypoll Result 2026 Live: बारामती पोटनिवडणूक निकाल LIVE, अकराव्या फेरीत सुनेत्रा पवारांना किती मते?

बारामती मतदारसंघाचे दिवंगत आमदार अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, या दुर्दैवी घटनेनं बारामतीसह देश हळहळला होता. अशातच याच मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडलीय. या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुनेत्रा पवार यांना बिनविरोध पाठिंबा दिला. आज पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, तर बारामतीत सुनेत्रा पवारांनी विजयानंतर मतदारसंघातील मतदारांना भावनिक साद घातली आहे.  

सुनेत्रा पवार यांचं ट्विट जसंच्या तसं 

'आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. 

आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.

हे ही वाचा : Rahuri By Poll Result 2026 Live Updates: राहुरीमध्ये बाराव्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डीलेंना 'एवढी' मतं

दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!', असं सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलं.