Amol Kolhe : '10-10 वेळा निरोप, लपून-छपून भेटी...', अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

04 Mar 2024 (अपडेटेड: 04 Mar 2024, 10:40 PM)

Amol Kolhe Reply Ajit Pawar : आपण जितक्या कलाकारांची नावे घेतली, यातील एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही. पण मला पहिल्याच टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगत अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.

 जर उमेदवारी देऊन चुक झाली, तर मला 10-10 वेळा पक्षात येण्याचा निरोप का पाठवला? लपून-छपून भेटीगाठी का घेतल्या? असा सवाल कोल्हेंनी अजित पवारांना केला आहे.

amol kolhe reply ajit pawar criticism shirur rally lok sabha election 2024 ncp sharadchandra pawar ncp politics

follow google news

Amol Kolhe Reply Ajit Pawar : 'नटनट्यांच राजकारणात काय काम? काहींना उमेदवारी देऊन चुक झाल्याची' टीका राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली होती. या टीकेवर आता अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. जर उमेदवारी देऊन चुक झाली, तर मला 10-10 वेळा पक्षात येण्याचा निरोप का पाठवला? लपून-छपून भेटीगाठी का घेतल्या? असा सवाल कोल्हेंनी (Amol Kolhe) अजित पवारांना (Ajit Pawar) केला आहे.  (amol kolhe reply ajit pawar criticism shirur rally lok sabha elction 2024 ncp sharadchandra pawar ncp politics) 

हे वाचलं का?

अजित पवारांनी आज शिरूर लोकसभा मतदार संघात जाऊन अमोल कोल्हेंवर टीका केली होती. अजित पवारांच्या या टीकेचा आता अमोल कोल्हेंनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून समाचार घेतला आहे. आपण जितक्या कलाकारांची नावे घेतली, यातील एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही. पण मला पहिल्याच टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगत अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. 

हे ही वाचा : कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून कसं मिळालं तिकीट? वाचा Inside Story

अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर राजीनामा दिल्याचा आरोप केला होता. या आरोपावर अमोल कोल्हे म्हणाले, जर राजीनामा देत असल्याचे तुम्ही म्हणता, मग मी संसदेत अनुपस्थितीत होतो का ? संसदेत बोलण सोडून दिलं होतं का? संसदेत प्रश्न मांडणे सोडून दिले होते का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती कोल्हेंनी अजित पवारांवर केली. 
 
आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (सुनील तटकरे) सुद्धा संसदेत रायगड लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतात. पण आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या कामगिरीपेक्षा आपण सेलिब्रिटी म्हणून मला हिणवता. पण माझ्या सारख्या शेतकरी कुटुंबातील एका मध्यमवर्गीय व्यक्तीची कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षापेक्षा उजवी आहे, असा टोला कोल्हेंनी अजित पवारांना लगावला. 

हे ही वाचा : 'तुम्हाला खोके नव्हे,कंटेनर लागतात', शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात

तसेच जर तुम्हाला वाटत असेल उमेदवार देण्याची चुक झाली, तर 10-10 वेळा माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षात या, हा निरोप पाठवण्यामागचं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याच कारण काय? असा सवाल कोल्हेंनी अजित पवारांना केला आहे 

अजित पवार शिरूरमधून काय म्हणाले? 

अजित पवार शिरूरमधील सभेतून बोलताना म्हणाले की, अभिनेता धर्मेंद, गोविंदा, राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीत उभे राहतात, पण यांचा राजकारणाशी काय संबंध? नटनट्यांच राजकारणात काय काम? काहींना (अमोल कोल्हे) उमेदवारी देऊन प्रचार करून आमच्याही चुका झाल्या आहेत. आम्हाला वाटलं काही खासदार (अमोल कोल्हे) चांगले निघतील. मात्र आम्हाला त्यांचा मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलं तो चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काही वेगळंच चालेलं. हे कळायला काही मार्ग नाही
, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

    follow whatsapp