'क्षणाचाही विलंब न लावता ठाकरेंना 50 कोटी देऊन टाकले', शिंदेंनी तोफ डागली
ज्या सामान्य शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना मोठी केली, बाळासाहेब ठाकरेंचे विचार मोठे केले. त्या शिवसेनेकडे तुम्ही 50 कोटी रुपये द्या असं पत्र पाठवता म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'तुम्हाला खोके नव्हे,कंटेनर लागतात'

ठाकरेंना 50 कोटी देऊन टाकले
Shiv sena: पक्षप्रमुख म्हणून आज तुमच्याकडे ना शिवसेना आहे, ना बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार आहेत. तुम्हाला बाळासाहेब नको, त्यांचे विचार नको तुम्हाला फक्त पैसा महत्वाचा असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. तुम्ही आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता मात्र तुम्हाला खोके लागत नाहीत, तर तुम्हाला कंटेनर लागतात असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गावागावातील कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून ही शिवसेना मोठी केली आहे. शिवसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन शिवसैनिकांनी शिवसेना मोठी केली आहे.
शिवसैनिकांनीच जेल भोगले, स्वतःच्या अंगावर केस घेतल्या तेव्हा तुम्ही कुठे होता असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
'उद्धव ठाकरे तुमच्यावर एक तरी केस दाखवा आणि कितीचं बक्षीस मिळवा असा खोचक सवाल करून त्यांनी 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.