मला उभा चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही, खासदार फुटणार असल्याच्या बातम्या पाहून अरविंद सावंत संतापले

मुंबई तक

10 Apr 2026 (अपडेटेड: 10 Apr 2026, 10:21 AM)

Arvind Sawant : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार फुटणार असल्याच्या बातम्या पाहून खासदार अरविंद सावंत चांगलेच संतापले आहेत. मला उभा चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही, असं सावंत यांनी म्हटलंय.

Arvind Sawant

Arvind Sawant

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'मला उभा चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही'

point

खासदार फुटणार असल्याच्या बातम्या पाहून अरविंद सावंत संतापले

Arvind Sawant on Uddhav Thackeray  : गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. माध्यमांतून अनेकदा या बातम्या समोर आल्या. मात्र, गुरुवारी रात्री काही खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. त्यानंतर ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतलीये. यावेळी ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ते या संपूर्ण प्रकरणाबाबत काय म्हणाले? जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हेही वाचा : कल्याण: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा धुमाकूळ, हायप्रोफाईल सोसायटीत मारहाण, शिवीगाळ अन्...

अरविंद सावंत म्हणाले, "एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 8 खासदार जाणार.. , अशा बातम्या पाहिल्या. त्यात माझा देखील फोटो.. म्हणे कालपर्यंत बाकींच्याची नावे देत होते. आज माझं पण नाव दिलं आहे. नशीब आहे आमचं की आमच्या अनिल देसाईंना वगळलं. या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. पत्रकारीता विकली गेली, याचं हे उदाहरण आहे. खोट्या बातम्या कशा दिल्या जातात? हे देशातील जनतेने हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी बातमी पूर्ण वाचली नाही. मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली. मला आश्चर्य वाटलं. कुठेतरी बैठक झाली. त्या बैठकीला सहा जण हजर होते. बाकी दोघजण व्हिडीओ कॉलवर बोलले. माझे सगळे मोबाईल देतो, त्यात मी बोललो असेल तर द्याल ती शिक्षा मान्य आहे."

"मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व करतात, त्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे. मला उभा चिरला तरी मातोश्रीची प्रतारणा होणार नाही. उद्धवजींची साथ मी सोडणार नाही. एका फोन कॉलवर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. बाळाासाहेबांनी आमदार केलं. उद्धव साहेबांनी खासदार केलं. त्याची प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा आहे. बाळासाहेबांचे विचार गद्दारांच्या बाबतीत काय होते? हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे. ओमराजे निंबाळकर आणि खासदार वाजेंचा फोन आला. ओमराजेही संतापले होते. इतक्या धादांत खोट्या बातम्या छापण्यात आल्या. मी बदनामीचा खटला टाकणार आहे", असंही अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कल्याण: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा धुमाकूळ, हायप्रोफाईल सोसायटीत मारहाण, शिवीगाळ अन्...