Beed Crime News , बीड : जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदेसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर 'शेवटचा जय महाराष्ट्र' लिहित टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. ढेकणमोहा परिसरात ही घटना घडली असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल; भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने साडी फाटल्याने ते खाली पडले. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमानं विकृतीची परिसीमा ओलांडली
व्हॉट्सअॅप स्टेटसने उडाली खळबळ
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी देवकते यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक चिठ्ठी आणि स्वतःचा फोटो पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी म्हटले की, "दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र..." या भावनिक आणि धक्कादायक मेसेजमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सरपंच पती आणि ग्रामसेवकावर आरोप
देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही गंभीर आरोप केले आहेत. आपल्या या टोकाच्या निर्णयासाठी त्यांनी गावचे सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरले आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारण तापले असून, या प्रकरणी पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पुणे रेल्वे स्थानकावर चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमानं विकृतीची परिसीमा ओलांडली
ADVERTISEMENT











