भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक, हॉटेल व्यावसायिकाचा दुर्देवी मृत्यू

भाजप खासदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला.

भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक

भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक

मुंबई तक

• 09:38 PM • 08 Jul 2025

follow google news

रोहित वाळके, अहिल्यानगर: भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्याविरोधात पोलिसात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर धस याच्या गाडीने पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे 7 जुलै रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. ही धडक भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या एम.जी. ग्लॉस्टर कारने (MH 23 BG 2929) दिली.

हे ही वाचा>> मर्सिडीज उलटली, 9 एअर बॅग उघडल्या, तरी बड्या उद्योजकाचा मृत्यू; समृद्धीवर भीषण अपघात

नितीन शेळके हे मोटारसायकलवरून यु-टर्न घेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या सागर धस यांच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

घटनेनंतर सुपा पोलीस ठाण्यात सागर धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मृत नितीन शेळके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विशेष म्हणजे त्यांच्या वडील व चुलत्याचाही याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता.

सुरेश धस यांच्या मुलाची कार

सागर धस यांच्याविरोधातील FIR जशीच्या तशी...

फिर्याद

08/07/2025

मी स्वप्नील पोपट शेळके वय 29 वर्ष धंदा-शेती व्यवसाय रा. जातेगाव फाटा
पळवे खु।। ता. पारनेर जि. अहिल्यानगर. समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद लिहुन देतो की, मी वरील ठिकाणी आई अलका,भाऊ रामदास असे एकत्र राहतो व शेती व्यवसाय करुन कुटुंबाची उपजीवीका चालवितो.

माझा चुलत भाऊ नितीन प्रकाश शेळके याचे हॉटेल सह्याद्री हे पुणे नगर जाणारे हायवे रोडवर पळवे शिवारात आहे व तो ते चालवितो.

दि. 07/07/2025 रोजी रात्री 10/30 वा. चे सुमारास मी जातेगाव फाटा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथे हॉटेल जोशी वडेवाले समोर माझा चुलत भाऊ नितीन याची कामानिम्मीत वाट पाहत असताना माझा चुलत भाऊ नितीन त्याचे हिरो कंपनीच्या स्पेडर मोटार सायकल नं. MH16DJ 3765 हिचेवरुन जातेगाव फाटा येथे नगर पुणे रोड क्रॉस करत असताना 'अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवर अहिल्यानगरकडुन येणाऱ्या एम.जी. कंपनीची ग्लोस्टर गाडी क्र.MH 23 BG2929 या वरील चालकाने भरधाव वेगाने माझ्या भावाच्या हिरो कंपनीच्या स्पेडर मोटार सायकल नं. MH 16DJ 3765 च्या डावे बाजुला जोराची धडक देवुन अपघात केला होता.

हे ही वाचा>> ढाब्यावरचं ते जेवण शेवटचं ठरलं! संभाजीनगरमध्ये कारचा अपघात, तीन मित्र जागीच ठार, तर दोघे...

त्यानंतर मी व तेथील इतर जमा झालेल्या लोकांच्या मदतीने गाडी व चुलत भावाला नितीन प्रकाश शेळके याला रोडच्या बाजुला घेवुन मी माझा चुलत भाऊ अमोल अशोक शेळके, सतिष प्रकाश शेळके व निलेश अशोक शेळके यांना फोन करुन सदर अपघाताबाबत मी त्यांना कळविले व निलेश याने स्वताहाची चारचाकी गाडी घेवुन आला व आम्ही त्याला घेवुन निरामय हॉस्पीटल सुपा येथे उपचाराकामी घेवुन आलो असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासुन तो • औषध उपचारापुर्वीच मयत झालेबाबत सांगितले. 

त्यानंतर आम्ही सदर अपघाताबाबत सुपा पोलीस स्टेशनला आलो असता मला आमचे नातेवाईक प्रसाद भास्कर तरटे रा. पळवे खु॥ ता.पारनेर जि. अहिल्यानगर यांनी अपघात करणारे 1) सागर सुरेश धस रा. आष्टी ता. आष्टी जि.बिड 2 ) सचिन दादासाहेब कोकणे रा.तवलेवाडी ता. आष्टी जि.बिड असे एम. जी. कंपनीची ग्लोस्टर गाडी क्र.MH 23 BG2929 यांनी केला आहे असे समजले. 

त्यानंतर सुपा पोस्टेला निरामय हॉस्पिटल येथुन अपघात झालेबाबत खबर देण्यात आली त्यावरुन सुपा पोलीस स्टेशन येथे आमृ 44/2025 BNSS कलम 194 प्रमाणे दि. 08/07/2025 रोजी 01/04 वा. दाखल करुन पोलीस अंमलदार सना माझे चुलत भावाच्या प्रेतावर पंचनामा करुन पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम करुन दि. 08/07/2025 रोजी 11/00वा. चे सुमारास प्रेत अंतविधीसाठी आमचे ताब्यात देण्यात आले आहे. 

अंतविधी केल्यानंतर मी समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर होवुन माझ्या भावाचा भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता गाडी चालवुन माझ्या भावाचा अपघात करुन त्याच्या मृत्युस व दोन्हीही वाहनांच्या नुकसाणीस कारणीभुत होणाऱ्या एम. जी. कंपनीची ग्लोस्टर गाडी क्र.MH 23 BG2929 या गाडीवरील चालक 1) सागर सुरेश धस रा. आष्टी ता. आष्टी जि.बिड यांचे विरुद्ध माझी फिर्याद आहे.
माझी संगणकावरील टंकलिखीत केलेली फिर्याद मी वाचुन पाहिली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.

    follow whatsapp