Buldhana Nagarpalika election , बुलढाणा : बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार मतदान करण्यासाठी पोहोचल्याचं समोर आलं आहे. बोगस मतदार असल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी संबंधिताला बेदम चोप देण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांच्या हवाली करण्याच्या आधी बोगस मतदाराने पळ काढलाय. दरम्यान, याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी आमदार संजय गायकवाड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवारांनी संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलाय.
ADVERTISEMENT
रोहित पवारांचे संजय गायकवाडांच्या मुलावर गंभीर आरोप
रोहित पवार म्हणाले, आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने पोलिसांशी हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावले. यावरून सत्ताधारी लोक मतदान प्रक्रियेत दिवसाढवळ्या किती घोळ घालत आहेत हेच दिसून येतं. सत्ताधारी लोक सातत्याने बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणुक प्रक्रिया प्रभावित करत असून आयोग मात्र झोपा काढत आहे. मालकांविरोधात काहीच करायचं नाही हे आयोगाने ठरवलंय का? असा सवालही रोहित पवार यांनी केलाय.
बुलढाण्यातील मतदानाची टक्केवारी जाणून घ्या...
पहिल्या दोन तासात बुलढाणा जिल्ह्यात सरासरी ८.०९ टक्के मतदानची नोंद झाली. सिंदखेड राजा (१०. ६२) मेहकर (१०. १८), मलकापूर (१०.१२), लोणार (९. ६७) या चार पालिकात दहा टक्केच्या आसपास मतदान झाले. या तुलनेत बुलढाणा ५. ०८, चिखली ५. ८१, जळगाव जामोद ८. ४२, खामगाव ८, नांदुरा ८. ८५, शेगाव ८. ६७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या दरम्यान ३६ हजार १८७ मतदारांनीच मतदानचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात पुरुष मतदानात आघाडीवर असल्याचे जिल्ह्यातील चित्र होते. २१००९ पुरुषांच्या तुलनेत १५१७८ महिलांनी मतदान केले. पहिल्या टप्प्यात मतदान शांततेने व सुरळीत पार पडले. मात्र मतदानची गती संथ आहे. दुपारी बारा वाजेनंतर मतदानचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











