रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान

मुंबई तक

• 03:10 PM • 14 Nov 2023

ऐन दिवाळीत रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या वादामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले होते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचं काम केले आहे.

Chief Minister Eknath Shinde intervened in the dispute between MP Gajanan Kirtikar and Ramdas Kadam

Chief Minister Eknath Shinde intervened in the dispute between MP Gajanan Kirtikar and Ramdas Kadam

follow google news

Ramdas Kadam: ऐन दिवाळी रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या वादामुळे जोरदार राजकीय फटाके फुटले आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत दोन दिवस राज्यातील राजकारण कदम आणि कीर्तिकर यांनी तापवले होते. तर आज मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत रामदास कदम यांनी कीर्तिकर-कदम वाद (Kirtikar-Kadam Controversy) शंभर टक्के मिठला असल्याचे माध्यमांसमोरच जाहीर केले. यावेळी त्यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांनी तुम्ही मनातील राग काढून टाका अशी विनंतीही रामदास कदम यांनी केली.

हे वाचलं का?

कदम-कीर्तिकर वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्या वादामुळे तापले होते. त्यानंतर आज रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या सल्ल्यानुसार आता वादावर पडदा पडल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आज वर्षावर एकनाथ शिंदे यांच्या भेट घेऊन या वादाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, भविष्यात एकमेकाबरोबर वाद घालू नका. कारण आपल्याला पक्ष वाढीसाठी काम करायचे असून आपापसामध्ये भांडू नका असा सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

शहानिशा न करता आरोप

रामदास कदम यांच्यावर गद्दारीचा शिक्का असल्याचे प्रेस नोटमधून सांगणे हे योग्य आहे का असा सवाल रामदास कदम यांनी आजही माध्यमांसमोर केला. यावेळी ते म्हणाले की, रामदास कदम यांना राजकारणातून संपवण्यासाठी तुम्ही जर अशा प्रकारची प्रेस नोट काढत असाल तर ते योग्य आहे असा सवालही त्यांनी केला. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिठल्याचेही त्यांनी जाहीर केले.

हे ही वाचा >> पत्नी परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत दिसली, संतापलेल्या पतीने…

वाद शिंदे समोर न जाता माध्यमांकडे

रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्याविषयी बोलताना सांगितले की, तुम्ही परस्पपर अशा प्रकारचा वाद घालत असाल तर ते चुकीचे आहे. कारण याकाळात आता पक्षवाढीचे काम करायचे आहे. मात्र नेतेच जर आपापल्यामध्ये वाद घालत असतील तर पक्षाचे चित्र लोकांसमोर वेगळ्या प्रकाराने जाते असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या वादावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कदम-कीर्तिकर हा वाद माध्यमांसमोर जाण्याआधी तो आमच्यासमोर सोडवण्याचा सल्लाही शिंदे यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

    follow whatsapp