CJP Protest Delhi : आंदोलनादरम्यान दगडफेक, दोन पोलीस गंभीर जखमी; Video व्हायरल

मुंबई तक

10 Oct 2026 (अपडेटेड: 10 Oct 2026, 04:26 PM)

CJP Protest Delhi : दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलन करण्याची परवानगी सीजेपीला मिळाली नसताना देखील आंदोलक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांच्या कारवाईत 150 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दीपके, रांका आणि दाससह इतर काही सीजेपीच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशातच पुढे कायदेशीर प्रमुख रत्ना यांना देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.

CJP Protest Delhi

CJP Protest Delhi

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आंदोलनादरम्यान दगडफेक

point

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

CJP Protest Delhi : दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलन करण्याची परवानगी सीजेपीला मिळाली नसताना देखील आंदोलन घटनास्थळी पोहोचले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे देखील दिल्लीत दाखल झाले. पोलिसांच्या कारवाईत 150 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ध्रुव राठी देखील पोलिसांच्याच ताब्यात असल्याची माहिती समोर आली. असातच सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नसून आता कॅनोट परिसरात दगडफेक करण्यात आली, ज्यात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रोच्या 45 स्थानकांचे दरवाजे काल बंद करण्यात आले होते, नंतर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. 

'जंतरमंतरवर आंदोलनासाठी परवानगीचा अर्ज केला नव्हता'

कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला परवानगी नकारल्याच्या संदर्भात, दिल्ली पोलिसांनी एक दिवस आधी एका निवेदनात म्हटले की, कॉकरोज जनता पार्टीचा 7 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला नव्हता, पुढील कार्यक्रम हा 10 ऑक्टोबर रोजी नियोजित करण्यात आला होता. याचा अर्थ अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जी दिली होती ती पाळण्यात आली नाही. 

पोलिसांनी या निर्णयामागे पूर्वीच्या आंदोलनांमध्ये नियमांचे पालन कथितरित्या उल्लंघन झाल्याचे कारण दिले. नवी दिल्लीच्या परिसरात बीएनएसएस कलम 163 लागू करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिल आहे.  

आंदोलनादरम्यान दगडफेक आणि दोन पोलीस जखमी

या आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कनॉट प्लेस परिसरात दगडफेक करण्यात आली. या घटनेदरम्यान पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली. यामुळे आता परिसरात कडक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेत.