Dhule Crime News, धुळे : धुळ्यातील सोशल मीडिया वादाला आता गंभीर वळण मिळालं आहे. धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्याबद्दल गोरक्षक संजय शर्मा यांनी सोशल मीडियावर केलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करण्यासाठी भाजपकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या बदनामीकारक पोस्टमुळे अस्वस्थ झालेल्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : विभाचा आजारपणामुळे मृत्यू की विष देऊन हत्या? संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच केले अंत्यसंस्कार!
आक्षेपार्ह पोस्टमुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ?
आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार, महापौर मायादेवी परदेशी यांच्याबद्दल सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टमुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्या होत्या. या अस्वस्थतेतून त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. महापौरांचे पती महादेव परदेशी यांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने मोठी दुर्घटना टळल्याचंही आमदारांनी सांगितलं. या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
हेही वाचा : Maharashtra weather : नोव्हेंबरच्या अखेरीस वातावरणात नवे बदल, थंडी नसून आता भलताच अलर्ट
रुग्णालयात वेळेत दाखल केल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती
आमदार अनुप अग्रवाल यांच्या दाव्यानुसार, महापौरांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याचं कुटुंबीय आणि उपस्थितांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं. महापौरांचे पती महादेव परदेशी यांनी वेळ न घालवता त्यांना धुळे शहरातील नकाणे रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू केले. वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. सध्या मायादेवी परदेशी यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, महापौर मायादेवी परदेशी यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ भाजपने काढलेल्या मोर्चात आमदार अनुप अग्रवाल यांनी संजय शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मोर्चादरम्यान त्यांनी महापौरांच्या विष प्राशनाच्या प्रयत्नाबाबत केलेल्या दाव्यामुळे प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झालं आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे महापौरांना हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. मात्र, विष प्राशन करण्याच्या प्रयत्नाबाबतची माहिती ही आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यावर आधारित आहे.
ADVERTISEMENT












