विभाचा आजारपणामुळे मृत्यू की विष देऊन हत्या? संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच केले अंत्यसंस्कार!

मुझफ्फरपूरमधील 39 वर्षीय विभा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या माहेरकडील मंडळींनी खळबळजनक आरोप केले आहेत. विभा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सासरचे कुटुंबिय फरार झाले आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विभाचा संशयास्पद मृत्यू

point

माहेरच्या मंडळींनी दारातच जाळला मृतदेह

Crime News : एका 39 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विभा ठाकूर असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूमागे सासरच्या मंडळींचा हात असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी थेट सासरच्या घरासमोरच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विभा हिचा विवाह 27 नोव्हेंबर 2014 रोजी चंदन ठाकूर याच्याशी झाला होता. या दाम्पत्याला 12 वर्षांची मुलगी असून ती सध्या अहमदाबाद येथे आजोबांकडे राहते. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे ही घटना घडली.

कसा झाला विभाचा मृत्यू?

विभा हिचे वडील बच्चू चौधरी यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पती चंदन ठाकूर, सासरे मुरारी प्रसाद ठाकूर, सासू मंजू देवी आणि नणंद यांच्यासह इतर लोकांवर त्यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर विभाचा सासरी छळ केला जात असल्याचा दावाही तिच्या वडिलांनी केला आहे. पती-पत्नीमधील वादावरून मुजफ्फरपूर आणि अहमदाबाद येथील न्यायालयांत खटलेही सुरू होते. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी विभाला सासरी असे काही अन्नपदार्थ खायला दिले, ज्यामुळे तिची प्रकृती अचानक बिघडली, असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान 16 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : पार्सल पोहोचविण्याच्या घाईत भरधाव ट्रकने दिली धडक, डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू

माहेरच्या मंडळींनी गाठले सासर

विभाच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्या मंडळींनी मुलीचे सासर गाठले. सासरच्या लोकांनीच विष देऊन तिची हत्या केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मृतदेह सासरच्या घरासमोर आणून तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. विभाचा भाऊ आकाश चौधरी यानेही पती आणि सासू-सासऱ्यांनी संगनमत करून विष देत तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मात्र, विभाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार, काय आहे BMC चा नवा प्लॅन?

सासरच्या मंडळींनी काढला पळ

या प्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, घटनेनंतर पती चंदन ठाकूरसह सासरच्या मंडळींनी घर सोडून पळ काढल्याची चर्चा आहे. पोलीस सध्या संबंधितांचा शोध घेत आहेत. त्यामुळे विभाचा मृत्यू नैसर्गिक होता की तिची हत्या करण्यात आली, याचे गूढ अद्याप कायम आहे.