राहुल गांधींची सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई; बॅरिकेडवर चढून फडकावला तिरंगा...

मुंबई तक

06 Oct 2026 (अपडेटेड: 06 Oct 2026, 08:17 PM)

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे काढलेला मोर्चा आकाशवाणी भवन परिसरातील आंदोलनात बदलला आहे.

congress rahul gandhi akashvani protest election commission gyanesh kumar sir vote chori india alliance

राहुल गांधी (फोटो सौजन्य: PTI)

Google CTA

नवी दिल्ली: इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे काढलेला मोर्चा आकाशवाणी भवन परिसरातील दीर्घ आंदोलनात बदलला. विरोधी खासदारांची मुख्य मागणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची असून, मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षणाबाबत (SIR) उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचीही त्यांची मागणी आहे.

हे वाचलं का?

खासदार सुरुवातीला संसद भवनातील मकर द्वार येथे एकत्र आले. त्यानंतर त्यांनी निर्वाचन सदनाकडे मोर्चा काढला. मात्र संसद मार्ग, नीती आयोग आणि आकाशवाणी भवन परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग केल्याने खासदारांना पुढे जाता आले नाही. यावेळी पाण्याच्या फवाऱ्यांच्या गाड्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राहुल गांधी बॅरिकेडवर चढले

मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी अचानक बॅरिकेडवर चढले आणि हातात तिरंगा फडकावला. तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बनर्जीही बॅरिकेडवर दिसले. पोलिसांनी काही नेत्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यादव, डेरेक ओ’ब्रायन यांच्यासह अनेक खासदारांना बसमध्ये बसवण्यात आले. प्रियंका गांधी यांनाही बसमध्ये नेण्यात आले, मात्र त्या काही वेळातच बाहेर आल्या.

हे ही वाचा>> राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ राडा

यानंतर राहुल गांधी आकाशवाणी भवनाच्या स्वागत द्वाराकडे गेले आणि परिसरात दाखल झाले. प्रियंका गांधी, दीपेंद्र हुड्डा, के. सी. वेणुगोपाल, पवन खेड़ा आणि इमरान प्रतापगढ़ी यांच्यासह इतर नेतेही त्यांच्यासोबत परिसरात गेले.

सर्व नेते गेट क्रमांक 4 जवळील एका झाडाखाली बसले. पोलिसांनी परिसर रिकामा करण्यास सांगितले, मात्र खासदारांनी नकार दिला. निवडणूक आयोगाचे कार्यालय काही अंतरावरच असताना निवडून आलेल्या खासदारांना तिथे जाण्यापासून का रोखले जात आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधींचा ‘वोट चोरी’चा आरोप

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सुमारे 300 खासदारांना रोखण्यात आल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाचे कार्यालय जवळ असूनही खासदारांना पुढे जाऊ दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा>> बंटी पाटलांना कोंडीत पकडण्याचा फडणवीसांचा प्लॅन? पुणे पदवीधर निवडणुकीत स्मिता जाधवांच्या एन्ट्रीची इनसाईड स्टोरी!

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, RSS प्रमुख मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी पुन्हा एकदा ‘वोट चोरी’चा आरोप करत देशातील लोकशाहीला नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

जुलैतील आंदोलनाची आठवण

राहुल गांधी यांचे हे आंदोलन जुलै महिन्यातील पीएम आवासाबाहेरील आंदोलनाची आठवण करून देणारे आहे. त्यावेळी ते सुमारे तीन तास पीएम आवासाबाहेर धरने देऊन बसले होते. कॉकरोच मार्चदरम्यान झालेल्या लाठीचार्जवरून त्यांनी अमित शाह यांच्याकडून उत्तर मागितले होते.

मात्र यावेळी आंदोलनाचे ठिकाण आकाशवाणी भवन परिसर आहे आणि मुद्दा निवडणूक प्रक्रिया व मतदार यादीशी संबंधित आहे. जुलैमध्ये आंदोलन अचानक घडले होते, तर यावेळी मागण्या आणि कार्यक्रम आधीच निश्चित असल्याचे सांगण्यात आले आहे.

विरोधक विरुद्ध सरकार आणि निवडणूक आयोग

विरोधक या आंदोलनाला लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांसाठीची लढाई असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे, भाजप आणि निवडणूक आयोगाने यापूर्वीही विरोधकांचे आरोप फेटाळून लावले असून, हे आरोप राजकीय असल्याचे म्हटले आहे.

सध्या आकाशवाणी भवन परिसरात विरोधी खासदारांचे आंदोलन सुरू असून, ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळात पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.