Maharashtra News : शिंदेंचे आमदार लॉबीत भिडले! एकमेकांना धक्काबुक्की

ऋत्विक भालेकर

01 Mar 2024 (अपडेटेड: 01 Mar 2024, 02:07 PM)

dada bhuse mahendra thorave fight in assembly : दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात का झाला वाद?

दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांना समजावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

dada bhuse mahendra thorve fight news

follow google news

Eknath shinde Shiv sena news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये राडा झाला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शिवसेनेच्या दोन आमदारांनी एकमेकांना धक्कीबुक्की केली. विधिमंडळ लॉबीमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांचा वाद मिटवला.

हे वाचलं का?

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांमध्ये वाद उफाळून आला. कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. विधिमंडळ लॉबीमध्ये असताना दोन्ही आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. 

हेही वाचा >> Navneet Rana यांना महाराष्ट्र सरकारचा 'सुप्रीम' झटका

यावेळी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. याबद्दलचे फोटो अथवा व्हिडीओ समोर आले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही आमदारांमध्ये मध्यस्थी करत असतानाचे व्हिडीओ समोर आले आहे.  

महेंद्र थोरवे-दादा भुसेंमध्ये राडा

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे विधिमंडळ लॉबीमध्ये समोरासमोर आले. दोघांमध्ये राडा झाला. दोन्ही आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि प्रतोद भरत गोगावले यांनी धाव घेतली आणि दोघांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोघांचा वाद मिटवला. 

दादा भुसे-थोरवेंमध्ये का झाला वाद?

शिवसेनेच्या या दोन्ही आमदारांमध्ये धक्काबुक्कीपर्यंत वाद का गेला, याबद्दल वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. दरम्यान, याबद्दल बोलताना सेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, "दादा भुसे एमएसआरडीसीचे मंत्री आहेत आणि थोरवे हे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कामाच्या अनुषंगाने बोलतील. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी काही कामे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. माझी कामे लवकर करा. पण, यासंदर्भात दादा भुसेंना काही कल्पना नव्हती की, काम कुठलं आहे. दादा भुसे म्हणाले की, संबंधित काम मला सांगा. अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेऊ."

शंभूराज देसाईंनी काय सांगितलं?

या घटनेबद्दल कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "आमदार-मंत्र्यामध्ये वादविवाद झाला, असं बिलकुल काही घडलेलं नाही. मी तिथे होतो. एक मंत्री आणि एक आमदार चर्चा करत होते. चर्चा सुरू असताना त्यांचा आवाज थोडा वाढला, यापलिकडे काही घडलेलं नाही."

"विकासकामांवरून त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती. काहीतरी तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्रिमहोदयांना, संबंधित आमदारांना घेऊन आम्ही लॉबीमध्ये चर्चा केली. अधिवेशन संपल्यानंतर आमदारांचं जे काम होतं, त्याबद्दल उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे", असं देसाई म्हणाले. 

हेही वाचा >> 'तो' फोन आला अन् मनोज जरांगे एका झटक्यात रुग्णालयातून...

"वाद झाला नाही. विवाद झाला नाही. एकमेकांना भिडले नाही. असं बिलकुल काहीही घडलेलं नाही. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोललो तर वाद झाला का? ते आमदार त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते, पण वाद विवाद झालेला नाही", असे देसाई यांनी सांगितले. 

    follow whatsapp