CJP Protest Delhi : दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनामुळे दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 25 हजार पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्टेशन, बस टर्मिनल आणि मेट्रो स्टेशनवर कडक नजर ठेवली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून 57 मेट्रो स्टेशनवरील येण्या-जाण्याच्या मार्गांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
बॉडी कॅमेऱ्यांचा वापर
आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि चोख नजर ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॉडी कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. हे अत्याधुनिक कॅमेरे अंधारातही उत्तम प्रकारे काम करण्यास सक्षम आहेत. आंदोलकांवर व संपूर्ण परिस्थितीवर सतत नजर ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांवर हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून प्रत्येक हालचालीची अचूक नोंद घेतली जाऊ शकेल.
हे ही वाचा : CJP Protest : दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपके कधी पोहोचणार?
पोलीस अन् नागरिकांच्या सुरक्षेसाठी
यापूर्वीच्या एका आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर विविध आरोप झाले होते. भविष्यात अशाच प्रकारच्या हाणामारी किंवा वादाच्या प्रसंगी पोलिसांवर लागणाऱ्या खोट्या आरोपांना ठोस व्हिडिओ पुराव्याद्वारे प्रत्युत्तर देता यावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. हे कॅमेरे सर्व घटना रेकॉर्ड करणार असल्याने पोलीस आणि नागरिक या दोघांच्याही सुरक्षेला बळ मिळेल, असे मत एका पोलीस कर्मचाऱ्याने व्यक्त केले आहे.
हे ही वाचा : CJP Protest : मेट्रो बंद, 75 रेल्वे रद्द, पोलिसांचा कडक पहारा...दिल्लीत काय घडतंय?
ठिकठिकाणी बॅरिकेडिंग
या मोठ्या आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. सुरक्षेच्या अतिसंवेदनशील उपायांमुळे तब्बल 75 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजधानीतील जनजीवन सुरळीत राहावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
ADVERTISEMENT











