Delhi News : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीबाबत मोठा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनीही मतांच्या चोरीवर भाष्य केलं होतं. अशातच आज 11 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षातील सर्वच खासदार या निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलनात सामील झाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कुत्र्यावर बलात्कार करणारा वासनांध सापडला, Video व्हायरल झाला अन् तुफान राडा
निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात 300 हून अधिक खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील तिथे उपस्थित आहेत. मोर्चाला दिल्ली पोलिसांना रोखलं. यावर अखिलेश यादव यांनी सांगितलं की, आपल्याला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. पोलिसांनी खासदारांना अटक केल्याचं चित्र व्हिडिओतून दिसत आहे.
तसेच राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही या आंदोलनात लढा देत आहेत. एवढंच नाही,तर महाराष्ट्रातील खासदार रणरागिणी सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे तसेच महुआ मोईत्राही लढा देताना दिसत आहेत. काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर काही खासदार निवडणूक आयोगाविरोधात लढा देताना दिसत आहे.
हे ही वाचा : कुत्र्यावर बलात्कार करणारा वासनांध सापडला, Video व्हायरल झाला अन् तुफान राडा
अखिलेश यादव बॅरिकेटवर चढले
परिस्थिती पाहता पोलिसांनी कडक बंदोबस्त केला होता. तो कडक बंदोबस्त पाहूनही अखिलेश यादव हे बॅरिकेटवर चढताना दिसत आहेत. प्रियंका गांधी देखील विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तेव्हा अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. आम्ही अनेकदा निवडणूक आयोगाला अॅक्शन घेण्यास सांगितली पण त्यांनी अॅक्शन घेतली नाही. आम्ही अनेकदा संसदेत निवडणूक आयोगाबाबत बोललो तरीही निवडणूक आयोग आमचं म्हणणं ऐकून घेत नसल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला.
ADVERTISEMENT
