"भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली, महाराष्ट्रात तर..", महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Rahul Gandhi Press Conference : भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नव्हतं. राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 48 जागांपैकी 13 जागा जिंकल्या होत्या.

Rahul Gandhi Press Conference

Rahul Gandhi Press Conference

मुंबई तक

07 Aug 2025 (अपडेटेड: 07 Aug 2025, 02:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर मोठे आरोप

point

महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान एक कोटी मतदार वाढले

point

पत्रकार परिषदेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi Press Conference : भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नव्हतं. राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 48 जागांपैकी 13 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला 9 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या तर काँग्रेसला फक्त 16 जागांवर विजय मिळाला. लोकसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत मात्र सपशेल पराभव झाला.

हे वाचलं का?

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मदतार याद्या बोगस असल्याचं आणि खोट्या मतदारांची खोटे पत्ते देऊन मतदार याद्यांमध्ये नोंद केल्याचा आरोप त्यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीदरम्यान मतदार वाढले. याबाबतीत असलेले सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाने 45 दिवसात नष्ट केले. 40 हजार मतदारांचे खोटे पत्ते देण्यात आले. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

"संध्याकाळी साडेपाचनंतर महाराष्ट्रात मतदान वाढलं.  भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली. महाराष्ट्रात पाच महिन्यात मतदार वाढले. महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान एक कोटी मतदार वाढले. मतदार यादीत मतदार का वाढले? याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली होती. मतदार यादी खरी आहे का? हा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीत आम्हाला यामागची कारणे समजली. महाराष्ट्रातील लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार वाढले. प्रत्येक मतदाराचा फोटो घेऊन आम्ही मतदार याद्या तपासल्या. मतदारयादीत मतदार का वाढवले? हा खरा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वोटर लिस्टमध्ये आले. 

हे ही वाचा >> Maharashtra Politics: दिल्लीत चाली रचल्या आता महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? पडद्यामागे चाललंय बरंच काही!

राहुल गांधी पुढे म्हणाले, "कर्नाटक अंतर्गत चाचणीत 16  जागांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात 9 जिंकल्या. मतदारयादीत असलेली लाखो नावं एक एक करून तपासावी लागली. बनावट पद्धतीने मतदान झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. डिजिटल मतदार यादी देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. निवडणूक आयोगाची भाजपसोबत हातमिळवणी झाली आहे. ही मतदार यादी खरी की खोटी? निवडणूक आयोगाने त्याचं उत्तर द्यावं. निवडणुकांचे निकाला एक्झिट पोलपेक्षा वेगळे असल्याचं समोर आलं. मतदारयादीत बनावट मतदार आहेत का? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला".

राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले, महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीदरम्यान मतदार वाढले. याबाबतीत असलेले सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाने 45 दिवसात नष्ट केले. 40 हजार मतदारांचे खोटे पत्ते देण्यात आले. कर्नाटकमध्ये पाच प्रकारे मतांची चोरी करण्यात आली. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. 11 हजार बोगस मतदारांनी तीन-चार वेळा मतदान केलं. कित्येक मतदारांची नावे अनेक राज्यातील मतदार याद्यांमध्ये नोंदवली गेली, निवडणूक आयेगाने यावर उत्तर द्यावं, असं थेट आव्हान राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केलं आहे. 

    follow whatsapp