राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Press Conference: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय काही कागदपत्र सादर करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

major rigging in maharashtra elections rahul gandhi showed evidence and claim what exactly is wrong with the voter list

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर मोठे आरोप

मुंबई तक

07 Aug 2025 (अपडेटेड: 07 Aug 2025, 02:55 PM)

follow google news

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज (7 ऑगस्ट) एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुन्हा एकदा एसआयआरबाबत (SIR)निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, संविधानाचा पाया मतदान आहे. अशा परिस्थितीत योग्य लोकांना मतदान करण्याची परवानगी दिली जात आहे का? मतदार यादीत बनावट मतदार जोडले गेले होते का?

हे वाचलं का?

राहुल गांधींनी मतदारांची 'ती' यादी दाखवून देशभरात उडवून दिली खळबळ

राहुल गांधी यांनी एक प्रेझेंटेशन केलं ज्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले. तसंच काही कागदपत्रं आणि फोटो दाखवत राहुल गांधींनी खळबळ उडवून दिली आहे. यावेळी राहुल गांधींनी आरोप केले की, महाराष्ट्रातील निवडणुका चोरल्या गेल्या. महाराष्ट्रात आम्ही निवडणुका हरलो, कारण महाराष्ट्रात 40 लाख मतदार गूढ आहेत. येथे 5 महिन्यांत लाखो मतदारांची नावं ही मतदार यादीत आली. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे. ज्या गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाकडे मागत होतो ते देखील त्यांनी दिले नाही. आम्ही त्यांच्याकडे मतदार यादीची सॉफ्ट कॉपी मागितली पण ते देखील देण्यास त्यांनी नकार दिला. आता निवडणूक आयोगाने हे सांगितलं पाहिजं की, मतदार यादी बरोबर आहे की चूक?

हे ही वाचा>> "भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली, महाराष्ट्रात तर..", विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राहुल गांधींनी केला मोठा गौप्यस्फोट

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही? आम्ही वारंवार आयोगाकडे डेटा मागितला पण तो आम्हाला देण्यात आला नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यासही नकार दिला.'

'देशात बनावट मतदान होत आहे. ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीतरी लिहिले आहे. मतदार यादीतील अनेक घरांचे पत्ता हा शून्य (0) असा आहे. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप जास्त आहे. तीन वेळा मतदान करणारे 11 हजार संशयास्पद लोक आहेत. हे लोक कुठून येत आहेत? एकाच पत्त्यावर 46 मतदार आहेत.

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप

राहुल गांधींनी यावेळी सांगितले की, 'आमच्या चौकशीत मतदार यादीत अनेक अनियमितता आढळून आल्या. या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीतरी लिहिले गेले आहे. मतदार यादीतील 40 हजार घरांचे पत्ते 0 आहेत. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप जास्त आहे. ही निवडणूक आयोग आणि भाजपच्या संगनमताने झाली आहे.'

हे ही वाचा>> पक्षांतरावरुन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना जबर दणका!

यावेळी राहुल गांधी असंही म्हणाले की, निवडणुकीत मतांची चोरी ही 5 प्रकारे होते.

मतांची चोरी 5 प्रकारे होते?

  1. डुप्लिकेट मतदार
  2. बनावट आणि चुकीचा पत्ता
  3. एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार
  4. चुकीचे फोटो
  5. फॉर्म 6 चा गैरवापर

 

    follow whatsapp