पक्षांतरावरुन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना जबर दणका!
तेलंगणातील काही आमदारांच्या पक्षांतरावरुन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना यांना कठोर शब्दात सुनावलं आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच दिशेला गेलं आहे. मग या दोन्ही पक्षांबाबत आधी निवडणूक आयोग नंतर विधानसभेत निर्णय झाला. आता कोर्टात दोन्ही पक्षांच्या संदर्भात कोर्टात केस सुरु आहे. सुनावण्यावर सुनावण्या होताहेत, तारीख पे तारीख मिळत आहे. अशात आता पक्षांतर करणाऱ्यांविरोधात सुप्रीम कोर्टानं मोठं भाष्य केलं आहे.
सुप्रीम कोर्टानं या संदर्भात एका राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना फटकारलंय. सुप्रीम कोर्टाच्या या आक्रमक पवित्र्याचा महाराष्ट्रातील दोन पक्षफुटीच्या घटनांवर काही परिणाम होणार का? नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय 20 ऑगस्ट रोजी अंतिम फैसला देणार होतं. मात्र, पुन्हा एकदा तारीख पुढं ढकलली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. शिवसेना पक्ष कोणाचा? याची उत्सुकता अवघ्या काही दिवसांवर आली असताना पुन्हा एकदा तारीख पे तारीख.










