Delhi Election 2025: भाजपने कमाल केली, राजधानीत कमळ फुलणार.. पाहा विधानसभा निवडणुकीचा निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ज्यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने 40 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी AAP पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल

मुंबई तक

• 09:41 AM • 08 Feb 2025

follow google news

Delhi Election Results 2025 Live Updates: नवी दिल्ली: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर आता मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. या विधानसभा निवडणुकीत 'आप' (AAP) देखील जोरदार लढत देत आहे. पण आपचे अनेक ज्येष्ठ नेते पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण  70 जागा आहेत आणि बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. (delhi vidhan sabha election result trends show reversal of power aap is biting in delhi lotus is blooming bjp is heading towards a big victory)

हे वाचलं का?

सकाळपासूनच सर्वांचे लक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) सलग तिसऱ्यांदा जिंकणार की भाजप राजधानीतील 27 वर्षांचा सत्तेचा दुष्काळ संपवणार याकडे लागले होते. त्याच वेळी, गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेसलाही या निवडणुकीकडून मोठ्या आशा आहेत.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: "दिल्लीत प्रचंड मोठा पराभव...", राहुल गांधींवर निशाणा साधत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

राजधानी दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. ज्यामध्ये  निवडणूक आयोगाच्या मते, एकूण 60.54 टक्के मतदान झाले होते.

अरविंद केजरीवाल 1500 मतांनी पिछाडीवर

दिल्ली निवडणुकीत ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये, केजरीवाल यांचा आप पक्ष सतत मागे पडत आहे. तर भाजपचे कमळ निर्णायक आघाडी मिळवत आहे. खुद्द अरविंद केजरीवाल हे 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. भाजप सध्या 43 जागांवर आघाडीवर आहे. 'आप'ने 26 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

हे ही वाचा>> Rahul Gandhi : महाराष्ट्रात लोकसभेनंतर फक्त 5 महिन्यात 39 लाख नवे मतदार कुठून आले? राहुल गांधींचा सवाल

करावल नगरमधून भाजपचे कपिल मिश्रा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेसचे देवेंद्र यादव बादली येथून आघाडीवर आहेत. 

ईव्हीएमची मोजणी सुरू झाल्यानंतर कालकाजी मतदारसंघात पहिल्या फेरीतच भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी हे 673 मतांनी आघाडीवर आहेत. तर ग्रेटर कैलास येथील सौरभ भारद्वाज सतत पुढे आहे.

नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे संयोजक अरविंद केजरीवाल, जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया आणि कालकाजी मतदारसंघातून आतिशी हे सातत्याने पिछाडीवर आहेत. दिल्ली कॅन्टमधून भाजपचे भुवन तंवर आघाडीवर आहेत. लक्ष्मी नगरमधून भाजपचे अभय कुमार वर्मा आघाडीवर आहेत. आदर्श नगरमधून आपचे मुकेश गोयल आघाडीवर आहेत. तर वजीरपूर मतदारसंघातून आपचे राजेश गुप्ता आघाडीवर आहेत.

 

    follow whatsapp