Sunetra Pawar: आज (31 जानेवारी 2026) सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (बारामती येथील विमान दुर्घटनेत) हे राजकीय संक्रमण घडत आहे. तसेच, आज दुपारी 2 वाजता एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवडले जाणार आहेत. याबाबतचे प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.
ADVERTISEMENT
- शपथविधीसाठी सुनेत्रा पवार लोकभवनात दाखल
- उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
- सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा
- थोड्याच वेळात सुनील तटकरे पत्रकारांशी साधणार संवाद; विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
- राज्यपाल देवव्रत आचार्य हे सुनेत्रा पवार यांना लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
- संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार
- विधिमंडळ कार्यालयात सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली
- गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
- सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली.
- सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड व्हावी यासाठी दिलीप वळसे-पाटील यांनी प्रस्ताव मांडण्यात आला.
- शोक प्रस्तावानंतर सुनेत्रा पवार यांच्या गटनेते पदाच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडण्यात आला.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांच्या निधनावर शोक प्रस्ताव मांडण्यात आला.
- सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल
- विधिमंडळ गट नेता निवडीच्या बैठकीत छगन भुजबळ सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता.. तसेच हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ अनुमोदन करण्याची शक्यता
- देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते विधानभवनाकडे रवाना
ADVERTISEMENT











