अजितदादांसोबत किती बैठका झाल्या? जयंत पाटलांचा मोठा खुलासा, मात्र 'त्या' एका प्रश्नाचं उत्तर टाळलं

Jayant Patil : शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 'मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजितदादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती.

Jayant Patil

Jayant Patil

मुंबई तक

• 01:24 PM • 31 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांसोबत किती बैठका झाल्या?

point

जयंत पाटलांचा मोठा खुलासा

Jayant Patil : शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 'मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजितदादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. बारामतीला जी सर्व नेत्यांची बैठक झाली त्यासाठी आधी आम्ही विमानाने जाणार होतो. पण बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरेल असे विमान मिळाले नाही.'

हे वाचलं का?

हे ही वाचा : "सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, याबाबत मला माहिती नव्हती", शपथविधीच्या आधी शरद पवारांनी केला खुलासा

'महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करु'

जयंत पाटील म्हणाले की, 'अजितदादांची अशी इच्छा होती की साहेबांच्या (शरद पवार) देखतच दोन्ही पक्ष एकत्रित करायचे आहेत. माझ्याबाबत जे जनमानसात आहे ते पुसून साहेबांच्या पक्षासोबत एकत्रित यायला तयार असल्याचं अजितदादा म्हणाले होते. जवळपास आठ-दहा वेळा त्यांच्यासोबत बैठका झाल्या. दोन-चार बैठका तर त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या. मागील दोन अडीच वर्षाचा कालखंड विसरुन महाराष्ट्रात राष्ट्रवादी एकत्रित करु अशी त्यांची आग्रही भूमिका होती'. 

..म्हणून 12 फेब्रुवारी ही तारीख निवडली

जयंत पाटील म्हणाले की, '12 फेब्रुवारीला एकत्रीकरणा बद्दलची तारीख ठरली होती. दोन्ही पक्ष आधी एकत्रित करायचे मग नंतर  बाकीचे निर्णय घ्यायचे असं अजितदादांच्या मनात होतं. या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे यांना आवर्जून घेतलं होतं.  जिल्हा परिषदांच्या निवडणुका आघाडीत लढवू. या निवडणुकींच्या निकालानंतर प्रक्रियेसाठी चार-पाच दिवस लागतील. त्यामुळे 12 फेब्रुवारी ही तारीख निवडण्यात आली होती.'

हे ही वाचा : '12 तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती', सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी शरद पवार काय म्हणाले?

तुम्ही सत्तेसोबत जाणार होता का?

एकत्रित येऊन तुम्ही सत्तेसोबत जाणार होता का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी टाळलं, ते म्हणाले की, 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा अजितदादांचा आग्रह होता. यामध्ये बरेच तपशील आहेत. त्याविषयी मी नंतर सविस्तर खुलासा करेन.'

'मुख्यमंत्र्‍यांची संमती असल्यानेच निर्णय'

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाविषयी पाटील म्हणाले की, 'सुनेत्रा वहिनींचा आज शपथविधी होतोय हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्यानेच हा निर्णय होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निर्णय सध्या प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ सध्या घेत आहेत असे दिसतंय. या तिघांच्या मतानुसार सध्या निर्णय होत असावेत.'

    follow whatsapp