Parth Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व कोण करणार, याचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत. आज सांयकाळी त्या या पदाची शपथ घेतील. सध्या सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत. दरम्यान, त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागी खासदार म्हणून पार्थ पवार यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजितदादांसोबत किती बैठका झाल्या? जयंत पाटलांचा मोठा खुलासा, मात्र 'त्या' एका प्रश्नाचं उत्तर टाळलं
पार्थ पवार राज्यसभेवर?
उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची जागा रिक्त करावी लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना त्यांच्या आईच्या जागी राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील राजभवनात आज (31 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता होईल. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेली बारामती विधानसभेची पोटनिवडणूक त्या लढवणार आहेत.
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अध्यक्षपद?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाऊ शकते. मात्र, पक्षातील एका मोठ्या गटाचे असे मत आहे की, सुनेत्रा पवार यांनी केवळ उपमुख्यमंत्रीच होऊ नये तर पक्षाची धुराही सांभाळावी. यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
हे ही वाचा : "बारामतीचे नाव 'अजितनगर' करा…" जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी!
2023 मधील फूट आणि सद्यस्थिती
2023 मध्ये बहुसंख्य आमदारांसह वेगळे होऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या 'महायुती'मध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली होती. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीच्या जागा सध्या 40 वर आल्या आहेत. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार महायुती सरकारमध्ये वित्त, नियोजन, उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण (अतिरिक्त कार्यभार) आणि अल्पसंख्याक विकास (अतिरिक्त कार्यभार) या विभागांची जबाबदारी सांभाळत होते.
आम्ही राष्ट्रवादीच्या निर्णयासोबत : फडणवीस
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'उपमुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयाचे समर्थन सरकार आणि भाजप करेल.' ते पुढे म्हणाले, 'मी एवढंच सांगू शकतो की, आम्ही अजित दादांच्या कुटुंबासोबत आणि राष्ट्रवादीसोबत खंबीरपणे उभे आहोत.'
ADVERTISEMENT











