Eknath Shinde Press Conference: "या महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला कामाची जी पोचपावती दिली आहे, ती परतफेड आम्ही या शंभर दिवसाच्या व्हिजनच्या प्रोग्रॅममधून करणार आहोत. सर्व अधिकारी, सर्व विभाग कामाला लागले आहेत. एक टीम काम करत आहे. आपापल्या विभागातील मंत्रीही कामाला लागले आहेत. मेट्रो 3 शंभर दिवसाच्या आत सुरु करत आहोत. मेट्रो 3 आता बीकेसी ते आत्रे चौक वरळी इथपर्यंत सुरू होईल. इथून नंतर कुलाब्यापर्यंत जाईल. मेट्रो 3 पूर्ण झाल्यावर रोज जवळपास 25 लाख प्रवासी रोज प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल. पुढच्या काळात इतर मेट्रो, अशा 50 किमीचे मेट्रोचे मार्गही लोकांसाठी खुले करणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हीटी मिळेल आणि याचा फायदा लोकांना होईल", असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या व्हिजन संदर्भात सर्व विभागात आढावा बैठका होत आहेत. शंभर दिवसात आपण काय काय करणार आहोत? कोणते निर्णय घेणार आहोत? हे सर्व सामान्यांचं सरकार आहे. विभागांमध्येही स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वांना वाटतंय की शंभर दिवसात आम्ही लोकांसाठी काही ना काही केलं पाहिजे.. या बैठकीत नगरविकास, गृहनिर्माण विभाग, एमएमआरडीए, महिला बाल कल्याण, अशा सर्वच विभागांचा समावेश होता. नगर विकासच्या माध्यमातूनही ज्या शहरांचे डीपी पेंडिंग आहेत, त्यावर तात्काळ निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली".
हे ही वाचा >> Suresh Dhas Parbhani : अजितदादा क्या हुआ ते वादा? बीडमधील परिस्थिती सांगत सुरेश धस यांचा तुफान हल्लाबोल
एमएमआरडीएच्या माध्यमातूनदेखील ठाणे-बोरीवली टनेलला लवकर मार्गी लावण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर मुंबईकरांसाठी ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सीबाबतही चर्चा झाली. मुंबई ईस्टर्न एक्स्प्रेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत,यावरही चर्चा झाली. काम करणाऱ्या महिलांसाठी घरं, विद्यार्थ्यांसाठी, गिरणी कामगारांसाठी, तसच पोलिसांसाठी घरं, अशा सर्वच विषयांवर आपण चर्चा करत आहोत. इंदू मिल आणि बाबासाहेबांचं जे स्मारक आहे, ते युद्धपातळीवर झालं पाहिजे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Crime News : बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा राग, भावानं थेट पेट्रोल टाकून बहिणीला जिवंत...
ADVERTISEMENT











