Mumbai Tak Baithak 2025 Devednra Fadanvs : मुंबई तक 2025 च्या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत अनेक नेत्यांनी राजकीय विचारमंथन केलं. यावेळी सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरलेली मुलाखत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच होती, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय मुद्द्यावर तसेच जनसुरक्षा कायद्यावर भाष्य केलं आहे. एवढंच नाही, तर त्यांनी यावेळी बोलताना नवी मुंबईतील विमानतळ भागात होणाऱ्या विकासकामावर मुलाखतीच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ममाफीबाबत आणि जनसुरक्षा कायद्याबाबत सांगितलं.
ADVERTISEMENT
प्रश्न :राज्यातील अर्थिक संतुलन बिघडलं असल्याचं बोललं जातंय याबाबत काय सांगाल?
तुमच्याकडे जर चांगला प्रकल्प असेल तर पैसा उभं करणं अवघड नाही. तसेच आम्ही पाच हजार गावांना कॉन्क्रेटच्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी आता वर्ल्ड बँकेकडून पंधरा हजारांचं कर्ज मिळवलं आहे. आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठी रिव्हर्स कॅल्क्युलेटर करणं गरजेचं आहे तो बदल आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे काही गोष्टीत नक्कीच बदल घडेल.
प्रश्न : नवी मुंबई एअरपोर्टच्या बाहेर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटी आणण्याचा प्रयत्न करत आहात?
अर्थव्यवस्था आणि विकासाच्या दृष्टीकोनासह शैक्षणिक विकासही होणार आहे. परदेशात जी मुलं शिक्षण घेण्यासाठी जातात त्या युनिव्हर्सिटी आपण इकडे आणणार आहोत. परदेशात शिक्षणासाठी जो खर्च होतो त्याहून कमी खर्च इथे होईल. शिक्षणाचा पैसा इकडे तिकडे घालवता येत नाही. कारण शिक्षणात विद्यार्थ्याप्रमाणेच शिक्षकही तितकाच महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ते पैसे कुठेही घालवता येत नाही. एवढंच नाही,तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने शिक्षणासाठी सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. एवढा पैसा कोणत्याच राज्याने खर्च केलेला नाही.
प्रश्न : संजय गायकवाड यांनी आमदार भवनात हॉटेल मालकाला केलेल्या हाणामारीबाबत काय सांगाल?
मी सत्तेत जरी असलो तरी मी खूपदा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे. आमदार भवनात जे प्रकरण घडलं त्याबाबत एफआरआय दाखल करायला लावला. आमदार विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये जे घडलं ते वाईटच आहे, त्याचं मी समर्थन करत नाही. जेवणाचा दर्जा निकृष्ट होतो, पण याचा अर्थ असा नाही की आमदाराने मारामारी केली पाहिजे.
प्रश्न : काही मंत्र्यांकडून फंड मिळत नसल्याचं अनेकजण म्हणाले नेमकं कारण काय?
हे आताच्या सरकारमध्येच नाही,तर यापूर्वीच्या सरकारमध्येही घडलेलं आहे. ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हाही अशाच तक्रारी होत्या. हा खरं तर समजून घेण्याचा विषय आहे.
प्रश्न : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होईल की नाही?
शेतकऱ्याला कर्जमाफी नक्की केली जाणार आहे, पण कर्जमाफी करण्याची एक वेळ आहे. पाच वर्षांमध्ये कर्जमाफी एकदा करता येईल. परिस्थितीनुसार कर्जमाफी केली जाईल. पण पुन्हा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान होईल. त्यामुळे आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. एवढंच नाही,तर आम्ही शेतकऱ्यांना 5 लाख कोटी रुपये देणार आहेत. शेतीच्यादृष्टीने यंत्रासाठी त्याचा फायदा होईल.
प्रश्न : जनसरक्षा कायद्याबाबत तुम्ही काय सांगाल हा कायदा तुम्हाला का इथं आणावासा वाटला
हा कायदा राज्याच्या बाहेर लागू करण्यात आला आहे. आता त्याच राज्यातील लोक इथं येऊन चुकीची कामं करत आहेत. याचं कारण की, आपल्या राज्यात असा कोणताही कायदा नाही, त्यासाठी हा कायदा राज्यात लागू करण्यात आलेला आहे. पण या कायद्याबाबत सांगितलं गेलं की काहीजण म्हणतात की, या कायद्यामुळे सरकारच्या विरोधात बोलता येणार नाही, पण असं काहीही नाही. तुम्ही इन्टायरिटीमध्ये कायदा वाचणार नाही, तोवर हा कायदा तुम्हाला समजणार नाही. कडव्या डाव्यांसाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे.
प्रश्न : दुसरीकडे अमित शाह म्हणतात की देशातून नक्षलवादाचा खात्मा झाला आणि दुसरीकडे हा कायदा लागू करण्यात आला?
नक्षलवाद हे एक स्लो पॉईजनिंग आहे. त्यांना ट्रेनिंग दिलं जातंय, हे सुरुच आहे. मी शंबर टक्के सांगतो की, याचा कोणत्याही विरोधकांवर चुकीचा पद्धतीने वापर केला जाणार नाही.
ADVERTISEMENT
