Mumbai Tak Baithak 2025 Chhagan Bhujbal: मुंबई: 'राजकारणात आपण ठरवतो तसं होतंच असं नाही. म्हणून मी आजसुद्धा सांगतो.. पवार कुटुंब किंवा ठाकरे कुटुंब हे अजिबात एकत्र येईल असं मला वाटत नाही..' असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती होईल अशी जोरदार चर्चा सुरू असताना भुजबळांनी मुंबई Tak बैठक कार्यक्रमात केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT
'पवार कुटुंब किंवा ठाकरे कुटुंब एकत्र येईल असं मला अजिबात वाटत नाही', पाहा छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
प्रश्न: तुम्ही अनेकदा उल्लेख केला की, काँग्रेस फुटली विभक्त झाली.. दरम्यान आता NCP आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता फुटले आहेत. कौटुंबिक कारणामुळे हे झालं आहे. तुम्ही दोन्ही पक्षाच्या अगदी जवळ होतात. विभक्त झालेले हे गट किंवा पक्ष पुन्हा एकत्र येतील असं वाटतं का? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी भुजबळ प्रयत्न करतील का?
छगन भुजबळ: हे पाहा.. दोन्ही ठाकरे बंधूंना ते लहान असल्यापासून ओळखतो. राज आणि राजचा दादू.. म्हणजे उद्धव.. राज वैगरे सगळे त्यांना दादू-दादू म्हणायचे. हे सगळे एकत्र यावे असं मला वाटतं.अजितदादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावे असंही मला वाटते. ही तुमच्या-आमच्या काही लोकांच्य मनातील इच्छा आहे. पण राजकारणात आपण ठरवतो तसं होतंच असं नाही. म्हणून मी आजसुद्धा सांगतो.. हे दोन्ही ठिकाणी एकत्र येणं आज तरी शक्य वाटत नाही.
कारण मनोमिलन हे एक कारण असतं आणि राजकारण हे दुसरं मोठं कारण असतं. दोन्ही कारणातून ज्यावेळेस ते बाहेर पडतील आणि योग्य वेळेला जवळ येतील तेव्हा हे होईल.
पक्ष घडतात, बिघडतात.. हे सामान्यपणे चालूच असतं. पण आपल्याला वाटतं ते प्रत्यक्षात येतं असं नाही. पण सध्या जे वाटतं की, दोन्हीकडे ना ठाकरे कुटुबं ना पवार कुटुंब एकत्र येणं मला अजिबात शक्य वाटत नाही. असं भुजबळ यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> Bala Nandgaonkar Mumbai Tak Baithak 2025: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? बाळा नांदगावकरांची Exclusive मुलाखत
प्रश्न: ज्यावेळी पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी तुमचं नाव मंत्रिमंडळात नव्हतं. तुम्ही तिथून निघून गेलात. काय भावना होती तुमची?
छगन भुजबळ: अगदी स्वाभाविक आहे ते.. माझं ठाम मत होतं की, माझा मंत्रिमंडळात शपथविधी होणार. त्यादृष्टीनेच मी नागपूरला गेलो होतो. शेवटपर्यंत माझं नाव आलंच नाही. त्यामुळे धक्काच बसला मला.
प्रश्न: जहां नही चैना, वहाँ नही रेहना, असं तुम्हाला म्हटलं होतं. या वेदनेमागं नेमकं कोण होतं? तुम्ही जे काही केलं, त्याचा फायदा झाला. सरकार पुन्हा प्रस्थापित झालं. पण तुम्हाला मात्र वगळण्यात आलं. त्यानंतर सागरवर काही गाठीभेटी झाल्या. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटला. धनंजय मुंडे यांची जागा जेव्हा रिक्त झाली, तुम्ही त्या जागेवर आला. राजकारणातील कमबॅक करणारा पॉवरफुल्ल नेता कोण, तर छगन भुजबळं. हे कमबॅक करण्याचं सूत्रं काय आहे?
छगन भुजबळ: मला जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा मी शपथ घेतली. देर आये, दुरुस्त आये..माझ्या बाबतीत म्हणा किंवा त्यांच्या बाबतीत म्हणा. माझं फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे, युतीचे सर्व आमदार, विरोधी पक्षाचे सुद्धा सर्व आमदार सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. प्रत्येक वेळी लढाई करण्याची गरज नाही. काही गोष्टी गोडी गुलाबीने होत असतील, तर लढाईचं कारण काय? भाजपच्या विरोधातही मी लढलो. मोदी साहेबांनाही विरोध केलेला. लढायच्या वेळी लढायचं.
हे ही वाचा>> Eknath Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री समजलोच नाही, त्यांना मी नेहमीच...' एकनाथ शिंदेंनी मनातलं सांगितलं!
प्रश्न: भाजप अल्पसंख्यांकांविरोधात वक्तव्य करतात. नितेश राणे, गोपीचंद पडळकर असे नेते राज्यभर जाऊन असं वक्तव्य करतात. या सरकारमध्ये राहून राष्ट्रवादी, ज्या पक्षाची सेक्युलर प्रतिमा आहे. ती पुढच्या काही वर्षात कायम राहील, तुम्हाला असं वाटतं का?
छगन भुजबळ: शेवटी पक्षाचं सुद्धा मतपरिवर्तन होतच असेल. ज्यावेळी मी सांगितलं होतं की, मंडळ आयोगाला सपोर्ट केला पाहिजे,त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेनं विरोध केला होता. कदाचित भाजपही त्यांच्यासोबत असेल. आता आरक्षण म्हटल्यावर शिवसेना, उद्धव ठाकरे विरोध करत नाहीत. भाजपही विरोध करत नाही. हा बदल आहे. सगळ्यांना तिकिटं देण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत आणि पुढे मंत्रिमंडळात घेण्यापर्यंत सर्वसमावेशक जर कोणी पावलं टाकत असेल, तर आम्हाला आणखी काय पाहिजे. अशं भुजबळ यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
