Ajit Pawar NCP office Woman dance on Wajle Ki Bara : नागपुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात एका महिलेने 'वाजले की बारा', या गाण्यावर तुफान डान्स केलाय. तिचा डान्स वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यत आहे. नागपुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी या महिलेने डान्स केला आहे. यावेळी 'वाजले की बारा' या गाण्यातील महिलेचा डान्स आणि शहर आणि ग्रामीण अध्यक्ष त्या गाण्याला देत असलेली दाद बघून टीकेची झोड उठत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर एनसीपी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना फोन करुन विचारणा केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रेल्वेखाली येऊन तरुणाने केली आत्महत्या, मुंबईतील जोगेश्वरी रेल्वेस्थानकावरील घटना, कुटुंबीय म्हणाले...
दिवाळी मिलन कार्यक्रमात महिलेचा तुफान डान्स
हा दिवाळी मिलन कार्यक्रम एनसीपी अजित पवार गटाच्या नागपुरातील मुख्य कार्यालयाच्या मुख्य हॉलमध्ये पार पडला. याठिकाणी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल समेत मोठ्या नेत्यांचे फोटो सुद्धा आहेत. लावणी सादर करणाऱ्या महिलेचं नाव शिल्पा शाहीर असं आहे. त्यांनी मुंबई तकशी फोनवर बोलताना सांगितलं की त्या त्याच्या मैत्रिणीसोबत याठिकाणी गेल्या होता. दिवाळी मिलन आणि सत्कार कार्यक्रम आहे, असं त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लावणी येते म्हणत लावणी करायला लावली.
अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण, सुनेत्रा पवारांचा फोन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या शहर कार्यालयात लावणी सादर करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्या शिल्पा शाहीर असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केलं आहे. लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी त्यांना फोन केल्याचंही अहिरकर यांनी सांगितलं. लावणी सादर करण्यासाठी कोणत्याही बाहेरील कलाकारांना बोलवण्यात आले नव्हते. पक्षाचे कार्यकर्ते दिवाळी मिलनाच्या निमित्ताने आपली कला सादर करत होते,असेही अहिरकर यांनी नमूद केले.
नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कार्यालयातील व्हायरल व्हिडिओ मधील महिला लावणी सम्राट असून ती पक्षाची पदाधिकारी आहे..दिवाळी निमित्त दिवाळी मिलन कार्यक्रम असल्याने आम्ही सर्व कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व एकत्र आलो होतो आणि मनोरंजनाच्या निमित्ताने सर्वांनी डान्स केला. त्यामुळे या व्हिडिओचा चुकीचा काढू नये, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नागपूर महिला अध्यक्षा सुनीता येणारे यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











