Devendra Fadnavis has ordered an investigation into Vasantdada Sugar Institute, पुणे : राज्यातील साखर उद्योगाच्या केंद्रस्थानी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) या प्रतिष्ठित संस्थेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ही संस्था साखर उद्योगाच्या संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अखत्यारीत आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊसगाळपावर एक रुपया या दराने VSI ला दरवर्षी मोठा निधी दिला जातो. मात्र, या निधीचा वापर मूळ उद्देशानुसार झाला आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ADVERTISEMENT
अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साखर उद्योग नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत हा विषय चर्चेत आला. बैठकीदरम्यान या निधीच्या वापराबाबत सविस्तर तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सरकारने साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही समिती सन 2009-10 पासून सुरू असलेल्या निधी योजनेचा तपशीलवार आढावा घेणार असून, अनुदानाच्या वापराची सखोल छाननी करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ही चौकशी केवळ आर्थिक अनियमिततेचा शोध घेण्यासाठी नसून, राजकीय पातळीवर शरद आणि अजित पवार यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
हेही वाचा : 'दोन उद्योगपतींची मुंबईवर नजर, अमित शाह 'अॅनाकोंडा'! उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघाती हल्ला
रोहित पवारांची फेसबुक पोस्ट चर्चेत
रोहित पवार म्हणाले, राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (VSI) सर्वांत मोठा वाटा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मा. अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर काम करतात. तरीही या संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ही केवळ नियमित प्रक्रिया नाही तर भाजपाने ‘ठाण्यानंतर’ आपला मोर्चा आता ‘बारामतीकडं’ वळवल्याचा त्याचा अर्थ आहे. भाजपला कुबड्यांची गरज नाही हे कालच गृहमंत्री अमित शाह साहेबांनी स्पष्ट केलं आणि सोबतच VSI च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना! हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्त्वाचं म्हणजे जिथं आम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो तिथं सरकार मौन बाळगतं, चौकशी करत नाही, पण राजकीय द्वेषातून एका चांगल्या संस्थेची चौकशी करून संस्थेचं नाव बदनाम केलं जातं, हे भाजपाचं आधुनिक राजकारण आहे. यातून कदाचित भाजपाचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं मात्र नुकसान होतंय, त्याचं काय? असा सवालही रोहित पवार यांनी केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपवाले भुरटे चोर', आता खासदार उदयनराजे भोसलेंचं प्रत्युत्तर
ADVERTISEMENT











