Udayanraje Bhosale on Ranjeetsinha Naik Nimbalkar, कराड : फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. "कोण काय बोललं हे मला माहित नाही, पण आरोप करणं हे फार सोपं असतं. मात्र सगळं सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या. आम्हीही गप्प बसलेलो नाही. निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन", असं उदयनराजे भोसले म्हणाले.
ADVERTISEMENT
डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने याने मोबाईल लपवला
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने याने आपला मोबाईल लपवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना शरण येण्यापूर्वी गोपाल बदने याने त्याचा मोबाईल लपवला आहे. सध्या पीएसआय गोपाल बदनेच्या मोबाईलचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. गोपाल बदने पोलिसांकडून मोबाईल कोठे आहे याची माहिती लपवत आहे.. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला पीएसआय गोपाल बदने याचा मोबाईल आहे. तर दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली पोलिसांना देखील दिली आहे. प्रशांत बनकर डॉक्टर महिलेच्या आत्महत्या करण्यापूर्वी देखील संपर्कात होता. डिजिटल पुरावे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी प्रशांत बनकर याला काही वेळा न्यायालयात हजर करणार आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गोपाल बदणेच्या मोबाईलमध्ये या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा मोबाईल शोधण्यासाठी पोलीस सध्या तांत्रिक तपास करत आहेत. आरोपी गोपाल बदणे पोलिसांकडून मोबाईल कुठे आहे याची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते. लपवल्या गेलेल्या मोबाईल मधून बरेच काही या प्रकरणाशी संबंधित असणारे ठोस पुरावे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये असलेले पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर हे दोघेही महिला डॉक्टरच्या सतत संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांनीही या गोष्टीची कबुली दिल्याचे समजते. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात मोबाईलवरून संभाषण आणि व्हॉट्सअॅप कॉल झाल्याचे पुरावे तपासात पुढे आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांचा लक्ष बदणेच्या मोबाईलकडे लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











