निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, 12 राज्यांमध्ये सुरू होणार SIR चा दुसरा टप्पा.. महाराष्ट्राबाबत काय ठरलं?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये सुरू होत आहे.

election commissions big announcement second phase of sir to start in 12 states

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

मुंबई तक

27 Oct 2025 (अपडेटेड: 27 Oct 2025, 05:36 PM)

follow google news

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत देशव्यापी SIR ची घोषणा केली. बैठकीदरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision)दुसरा टप्पा 12 राज्यांमध्ये सुरू होत आहे. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदार जोडणे आणि चुका दुरुस्त करणे यांचा समावेश असेल.

हे वाचलं का?

दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "आज आम्ही विशेष सघन पुनरीक्षण (SIR) च्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीची घोषणा करण्यासाठी आलो आहोत. मी बिहारच्या मतदारांना शुभेच्छा देतो आणि या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी झालेल्या आणि ती यशस्वी करणाऱ्या 75 कोटी मतदारांना सलाम करतो."

हे ही वाचा>> राज ठाकरेंकडून पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', पीएम मोदी अन् शिंदेंच्या आमदारांचे व्हिडीओ दाखवले, निवडणूक आयोगाला घेरलं

त्यांनी पुढे सांगितले की, आयोगाने सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केली.

आतापर्यंत आठ वेळा SIR

1951 ते 2004 दरम्यान देशात 8 वेळा विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, राजकीय पक्षांनी मतदार याद्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे.

हे ही वाचा>> मोठी बातमी : ठाकरे बंधू आक्रमक, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बिनतोड सवाल; बैठकीत काय घडलं?

आज रात्री याद्या फ्रीज केल्या जाणार आहेत. या टप्प्यात ज्या राज्यांमध्ये एसआयआर घेण्यात येईल त्या राज्यांमधील मतदार याद्या आज रात्री फ्रीज केल्या जातील.

'या' राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात होणार SIR सुरू

  • अंदमान-निकोबार 
  • छत्तीसगड
  • गोवा
  • गुजरात
  • केरळ
  • लक्षद्वीप
  • मध्यप्रदेश
  • पुद्दुचेरी
  • राजस्थान
  • तामिळनाडू
  • उत्तर प्रदेश
  • प. बंगाल

महाराष्ट्रात SIR का होणार नाही? 

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी ज्या केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये SIR प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केलेली आहे त्यात महाराष्ट्राचे नाव नाही. त्यामुळे तूर्तास तरी महाराष्ट्रात SIR प्रक्रिया ही पार पडणार नाही. 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसंबंधी प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळेच तूर्तास महाराष्ट्रात SIR प्रक्रिया तूर्तास घेतली जाणार नसल्याचं समजतं आहे. 

    follow whatsapp