Balasaheb Thorat Mumbai Tak Baithak 2025: "महायुद्ध जिंकल्यावर चर्चिलचं सुद्धा..", बाळासाहेब थोरात विधानसभेच्या पराभवावर खुलेपणाने बोलले!

Balasaheb Thorat Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबई Tak बैठकीत त्यांचं व्हिजन मांडलं. याशिवाय त्यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव यावर देखील भाष्य केलं. पाहा नेमकं काय म्हणाले.

Mumbai Tak Baithak 2025: बाळासाहेब थोरात

Mumbai Tak Baithak 2025: बाळासाहेब थोरात

मुंबई तक

• 02:37 PM • 16 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई Tak बैठकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

point

पाहा बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले

point

महाराष्ट्रातील राजकारणावर पाहा बाळासाहेब थोरातांचं व्हिजन

Mumbai Tak Baithak 2025 Congress Leader Balasaheb Thorat: मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत बहुमत जरी मिळालं असलं, तरी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची मात्र राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली. कारण मागील 40 वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेले आणि 18 वर्ष मंत्रिमंडळात राहणारे थोरात कसे पराभूत झाले, यामागची कारणे काय होती? याबाबत थोरात यांनी मुंबई TAK च्या बैठकीत स्पष्टच सांगितलं. बाळासाहेब थोरात काय म्हणाले, सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

पाहा बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले

प्रश्न: 1985 मध्ये लोकसभेत काँग्रेस पक्षाची लाट आली होती. त्यावेळी तुमची महाराष्ट्र विधानसभेत एन्ट्री झाली. अटल बिहारी वाजपेयींसारखे नेतेसुद्धा निवडणूक हरले. त्यानंतर त्यांची मुंबईत सभा झाली होती. त्या सभेला तुडुंब गर्दी झाली होती. तेव्हा ते म्हणाले 'हारा हुआ वाजपेयी' पाहायला आले आहेत. 1985 पासून 2024 पर्यंत विधानसभेत राहिल्यानंतर अनपेक्षित पराभवाची तुम्हाला कल्पना होती का? तुम्हाही संगमनेरमध्ये गेल्यावर हारा हुआ बाळासाहेब पाहायला आले आहेत, असं वाटतं का? 

बाळासाहेब थोरात: 1985 मध्ये सर्वात कमी वयाचा म्हणून मी विधानसभेत आलो. नंतरच्या आठ निवडणुका मी खूप चांगल्या मताने जिंकलो. मतदारांशी कनेक्ट होण्याची सिस्टमसुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे निर्माण केली. या सर्व पार्श्वभूमीवर मी महाराष्ट्र फिरत होतो. मला तर बिलकूल शंका नव्हती की, आपल्या बाबतीत असं काही घडू शकतं. परंतु, जे घडलं ते वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकारली पाहिजे.

हे ही वाचा>> Sana Malik, Sneha Dube Mumbai Tak Baithak 2025: 'अजितदादांनी सांगितलंय, अजिबात सेक्युलर विचार सोडणार नाही', सना मलिक स्पष्टच बोलल्या!

आता कारणं वगैरे तो भाग वेगळा आहे. इतकी मोठी 40 वर्ष संधी मिळणं ही काही सोपी गोष्ट नसते. ती संधी जनतेनं दिली आहे. जवळपास 18 वर्ष मी मंत्रिमंडळात राहिलो. प्रांताचा अध्यक्ष राहिलो. काँग्रेसच्या दिल्लीच्या राजकारणात मी राहिलो. ही खूप मोठी संधी मिळाली. मतदारसंघात जिथे गेलो, तिथे चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील बरेचशे टार्गेट मी पूर्ण केले आहेत. अशावेळी त्या गोष्टीचं वाईट वाटून घेण्याचं काम नाही. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर सुद्धा चर्चिलचं सरकार आलं नव्हतं. राजकारणात असं होऊ शकतं. स्वीकारलं पाहिजे. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

प्रश्न: मतदारसंघात गेल्यावर कुठंतरी तुम्हाला वाटलं का.. यांनी आपल्याला मत नाही दिलं. इतके वर्ष त्यांच्यासाठी इतकं केलं. काय झालं..कशामुळे तुम्ही असं वागलात? असा त्यांना जाब विचारावं वाटलं नाही? 

बाळासाहेब थोरात: हे खरं आहे की, काही दिवसांमध्ये मी संवादाची सभा बोलावली. नंतर दिल्लीवरून असं ट्वीट केलं गेलं की, ही विजयी उमेदवाराची सभा नाही. ही पराभूत उमेदवाराची सभा आहे. दहा हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आपण फार दु:खं करून घ्यायचं आणि दोष द्यायचं नाही.

हे ही वाचा>> Narendra Jadhav Mumbai Tak Baithak 2025: '...तर जास्त भाषा सुरुवातीपासून मुलांवर न लादलेल्या बऱ्या', नरेंद्र जाधवांनी मांडलं रोखठोक मत

प्रश्न: राजकारण सत्तेचे दिवस पटापट संपतात. पण विरोधी पक्षातले दिवस हळूहळू जातात. म्हणजे एक दिवस मोठा वाटायला लागतो. तुम्ही विरोधी पक्षात पण काम केलं आहे. अशी काही परिस्थिती आहे का?  

बाळासाहेब थोरात: माझ्यासाठी तसं वाटण्याचं काही कारण नाही. माझ्या सहकार संस्था चांगल्या आहेत. ज्यावेळी आपण पूर्णत्वाकडे जातो. नंतर पुढे काय? आपण जे पूर्ण केलं आहे, त्याची गुणवत्ता वाढवणं ही एक मोठी संधी असते. माझ्या व्यक्तीमत्वासह आमच्या कौटुंबिक काही गोष्टी असतील, त्या कशा चांगल्या करता येतील. तालुक्याचं काम कसं चांगलं करता येतील. या गोष्टींवर काम करत राहिलं, तर दिवस अपुरा आहे. दिवस मोठा होत नाही. दिवस अपुरा पडतो, इतकं काम आहे. असंही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

    follow whatsapp