Mumbai Tak Baithak 2025 : राज्यात सध्या उजव्या विचारसरणीचं सरकार अस्तित्वात आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हा पक्ष देखील समाविष्ट आहे. यावरून अनेकदा अजित पवार यांना टार्गेटही केलं जातं. अजित पवारांनी सत्तेसाठी सेक्युलर विचारधारेशी फारकत घेतली अशी टीका विरोधक वारंवार करतात. मात्र, याचबाबत आता त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार सना मलिक यांनी थेट अजित पवारांनी त्यांना काय सांगितलं याबाबत जाहीर विधान केलं आहे. 'मुंबई Tak बैठक'मध्ये सना मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलं की, अजितदादांनी सांगितलंय की, 'आपण अजिबात सेक्युलर विचारधारेशी तडजोड करणार नाही.'
ADVERTISEMENT
मुंबई Tak बैठकीच्या पहिल्याच सत्रात पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार सना मलिक, स्नेहा दुबे आणि बाबासाहेब देशमुख हे सहभागी झाले होते. ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांचं व्हिजन मांडलं. पण याचवेळी सना मलिक यांनी एक मोठं विधान केलं आहे.
'भाजपसोबत सत्तेत पण सेक्युलर विचार सोडणार नाही'
प्रश्न: भाजप किंवा भाजपच्या नेत्यांकडून विशिष्ट समुदायाबद्दल बोललं जातं. आक्रमक भाषा वापरली जाते. हल्ला करण्याचे शब्दसुद्धा वापरले जातात, अशा परिस्थितीत तुमच्या मतदारसंघात तुम्हाला अडचण निर्माण होते का?
सना मलिक: निवडणुकीच्या दोन तीन महिन्यांआधीच आम्ही ठरवलं की, आम्ही दादांसोबतच असणार. कारण असं होतं की, अडचणीच्या वेळी जेव्हा मतदारसंघात मला खूप बारकाईने बघावं लागत होतं, तेव्हा दादांकडे जायचो. मी माझ्या कुटुंबासोबत एकत्र बसून ते फायनल केलं. आमच्या अडचणीच्या वेळी ते ठामपणे उभे होते. त्यांच्यासोबत आपण राहणार. आमच्या समोर खूप लोक आले, ते म्हणाले महायुतीत तुम्ही प्रतिनिधी म्हणून उभे राहणार, तर तुमच्या सीटचं नुकसान होईल.
आम्ही सांगितलं, आम्हाला आमच्या कामावर खूप विश्वास आहे. लोकांसमोर आम्ही राष्ट्रवादीचा, महायुतीचा उमेदवार असं कधीही समोर गेलो नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही समोर गेलो. दादांनी सांगितलं आपण अजिबात सेक्युलर विचारधारेवर तडजोड करणार नाही. असं सना मलिक यावेळी म्हणाल्या.
पाहा मुंबई Tak बैठकीत सना मलिक, स्नेहा दुबे आणि बाबासाहेब देशमुख नेमकं काय म्हणाले?
प्रश्न: तिन्ही अधिवेशनात तुमचा परफॉरमन्स कसा राहिला?
स्नेहा दुबे: छान होता. गेल्या तीन अधिवेशनापेक्षा या अधिवेशनात बोलण्याची संधी जास्त मिळाली. अधिवेशन काळात जी आयुधं असतात, त्या मार्गाने आम्ही लोकांचे प्रश्न सभागृहात मांडू शकतो. जास्त आयुधांचा वापर मला यावेळी करता आला. लक्षवेधी, पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन असेल, या माध्यमातून जास्तीत जास्त संधी यावेळी मिळाली.
सना मलिक: अनुभव खूप चांगला आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी मी तिथे अनुभव पाहत नाही, तर मी काय शिकली, हे आधी मी पाहतो. सभापतींना आम्ही विनंती केली की, आम्हाला संधी द्या. प्रश्न कशा पद्धतीने विचारले पाहिजे, या सर्व गोष्टींचा जास्त अनुभव मला या अधिवेशनात घेता आला. मला असं वाटतं की, प्रत्येक अधिवेशनात ग्राफ वाढत चालला आहे.
बाबासाहेब देशमुख: निश्चितच खूप चांगला अनुभव आहे. मागच्या दोन अधिवेशनात काही प्रश्नांची उकल नव्हती, त्यासाठी मी मार्चपासून आतापर्यंतच्या कालावधीपर्यंत प्रश्नांचा अभ्यास केला. माझ्या मतदारसंघातले,महाराष्ट्रातील तरुणांचे काही प्रश्न असतील, तर ते मला मांडण्याची चांगली संधी मिळाली.
हे ही वाचा>> Mumbai tak Baithak 2025: 'म' महाराष्ट्राचा, 'म' मराठीचा... मुंबई Tak बैठकीला सुरुवात, राजकीय नेते मांडणार व्हिजन!
प्रश्न: अधिवेशनात किंवा सभागृहात कशाची जास्त भीती वाटते?
स्नेहा दुबे: बोलण्याची संधी मिळेल की नाही, याची भीती वाटते. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आमच्या सदस्यांपैकी आम्हाला बोलण्याची संधी मिळेल का, हे पाहता येतं. जे बोलतोय त्याचा उपयोग आपल्या मतदारसंघात होणं गरजेचं असतं.
सना मलिक: मला कोणत्याही प्रकारची जास्त भिती वाटत नाही. मराठी भाषेच्या व्याकरणाची भीती वाटते. जेव्हा मी सभागृहात बोलते, त्यानंतर कधी कधी मी माझा व्हिडीओ बघतच नाही. मला माहितेय, काहीतरी गडबड झालीय.फक्त भाषेची भिती वाटते. मराठी-हिंदी वादामुळे नाही. तर भाषेवर नियंत्रण नाही, त्याची भिती वाटते. वाचताना मला पूर्णपणे मराठी भाषा कळते. पण बोलताना
बाबासाहेब देशमुख: स्वर्गीय आबासाहेबांची आणि माझी नकळत तुलना होते. मनात भिती असते की, सभागृहात आपल्याकडून असंवेधानिक शब्द जाता कामा नये. स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी ज्या पद्धतीनं सभागृह चालवलं, ती गरिमा आपल्याकडून जपली गेली पाहिजे. आदरयुक्त मतदारसंघातील मतदारांची जी भावना असते, त्याची भीती असते.
ADVERTISEMENT
